सर्वसामान्यांच्या दु:खावरची फुंकर- पंकजाताई मुंडे




सर्वसामान्यांच्या दु:खावरची फुंकर- पंकजाताई
———————————-

बीड

काही जखमा अशा असतात की , जिथं खपलीचंही ओझं होत असतं.या जखमा खरंतर कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत.परंतु मराठवाड्याला,विशेषतः बीड जिल्ह्याला पावसानं इतकं झोडपून काढलंय की कित्येक वर्षांचा दुष्काळ वाहून नेताना अनेक संसार,शेतीमालही सोबत नेले.अक्षरश: होत्याचं नव्हतं करणाऱ्या या जिवघेण्या संकटात मदतीला आल्या त्या पंकजाताई!

आपली माणसं ओक्साबोक्शी रडतायेत.कुणाचा संसार वाहून गेलाय,कुणाचं पशुधन तर कित्येकांचा शेतीमाल! मग अशावेळी आपल्यातला ‘माणूस’ जागा ठेवत भर पावसात या अस्मानी संकटानं हतबल,जर्जर झालेल्या लोकांना धीर देणार नाहीत त्या ताई कसल्या?

सत्तेची झूल अंगावर मिरवत जनतेप्रती बेगडी प्रेम दाखवणारे पुढारी कुठं अन् आधाराचा हात देऊन सांत्वन करणाऱ्या पंकजाताई कुठं! हे संकट टळेल लवकरच..लोकं नव्या जोमाने उभाही राहतील पण एक मात्र नक्की की ताईंची संवेदनशीलताही ते लक्षात ठेवतील.

रंजल्या-गांजल्या याच भोळ्याभाबड्या जनतेचे आशीर्वाद ताईंना हा सेवाधर्म जगण्यासाठी प्रोत्साहित करतील यात शंका नाही.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा