महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी 




 महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी

बीड प्रतिनिधी l देशातील इंग्रजांची राजवट उलथून टाकण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वतंत्र्याचा लढा दिला. भारत देशाला गुलामीतुन मुक्त करण्यासाठी महात्मा गांधींचे योगदान मोलाचे आहे. सत्य आणि अहींसा हे तत्व आचरनात आणुन लढा दिला. देशा बाहेरही आफ्रीका सारख्या देशात मानवतावाद समोर ठेऊन प्रभावी पने कार्य केले. साधी राहानी आणि उच्च विचार धारा त्यांच्या व्यक्तीमत्वात होती. त्यांचे विचार आणि प्रभावी वक्तुत्वाने लोक स्वतंत्र्य लढ्यात उतरले. मिठाचा सत्या ग्रह स्वदेश चळवळ स्वयंम पुर्ण ग्राम चळवळ अशा विविध चळवळी राबवून स्वतंत्र लढ्या बरोबरच लोकहिताचे काम त्यांनी निस्वार्थ भावनेतुन केले. बलाढ्य इंग्रजांशी लढा देताना कधीही शस्त्र हातात घेतले नाही. शेवट पर्यंत अहिंसेच्या मार्गानेच लढा ‍दिला. गांधीजीं ची अहिंसातम्क चळवळ सामान्य जनतेत प्रचंड लोक प्रिय झाली. व त्याच्या चळवळीला यश ही आले. म्हणुनच आज देशा सह जगाने अहिसेचा मार्ग स्वीकारला. असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचीटणीस ॲड. सर्जेराव तांदळे यांनी केले.

आज बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे लोकप्रिंय पंतप्रधान लाल बाहादुर शास्त्री यांची जयंती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व प्रमुख पदाधिकरी यांच्या उपस्थितीत साजरी करुन अभिवादन करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर सेवा समर्पण अभियान राबविण्यात येत आहे. लोकनेत्या तथा भाजपा राष्ट्रीय सचिव माननीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडेयांच्या मार्गदर्शनानुसार आज शनिवार  रोजी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण (मल्टीपर्पज ग्राउंड) बीड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याची स्वच्छता  व दुग्धाभिषेक करण्यात आला.

बीड शहरात महात्मा गांधी जयंती निमित्त आत्मनिर्भर भारत हा संकल्प जनमानसा पर्यंत पोहचवण्यासाठी तिरंगा यात्राचे आयोजन केले होते. परंतु पोलिस प्रशासनाने परवांगी नाकारल्याने तिरंगा यात्रा रद्द करण्यात आली.

या अभिवादन कार्यक्रमास नवनाथ शिराळे, ॲड.सर्जेराव तांदळे, विक्रांत हजारी, प्रा.नागरगोजे, भगिरथ बियानी. स्वप्नील गलधर, सुभाष धस, अजय सवाई, सलीम जहागीर, डॉ.जाधव, शांतीनाथ डोरले, संग्राम बांगर, संध्या राजपुत, मिरा गांधले, शैलजा मुसळे लता मस्के, गंगूबाई कुडके, किरण बांगर, ईरशाद भाई, नागेश पवार, कृष्णा तिडके, विलास बामने, प्रमोद रामदासी, मनोज ठाणगे, फारुक भाई, बालाजी पवार, देवा दहे, विनायक मुंडे, महेश सावंत, बंडु मस्के, राकेश बीराजदार, घोलप मामा, रविंद्र कळसाने, अजय ढाकणे, अनिल शेळके, सुरेखा औटी, दिपाताई रुईकर, राजेश चरखा, सय्यद समीर, अड्डो जहागीरदार बाबूलाल ढोरमारे, आकाश घोरपडे,अमान शेख आदि उपस्थितीत होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा