अंजनवती ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी 




अंजनवती ग्रामपंचायत कार्यालयात  महात्मा गांधी जयंती साजरी
बीड प्रतिनिधी:-  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती तालुक्यातील अंजनवती येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्यभर आयुष्याच्या मार्गांने लढा उभारून आपले संपूर्ण आयुष्य देशी सेवेसाठी अर्पण करणाऱ्या या महामानवाला जयंती निमित्त गावकऱ्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले
अंजनवती चे ग्रामसेवक माननीय प्रवीणजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाळासाहेब मोरे पाटील यांच्या शुभहस्ते बापूजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य विष्णू अभिमन्यू येडे, विठ्ठल शिंदे, कैलास परदेशी, अशोक सोनवणे, आरोग्य विभागाचे बारगजे साहेब, शेषमोहन येडे, नितीन गायकवाड, फुलचंद ( दादा ) येडे,कैलास जाधव, नितीन येडे, गव्हाणे भैय्या, अभिजीत ( बंडु ) येडे, गणेश जोशी यांच्यासह गावातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती.
ग्रामसेवक साहेबांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा