आ.विनायकराव मेटे यांचा अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाचा पाहणी दौरा




 

मुख्यमंत्र्यांनी फक्त गोड गोड बोलून आणि धीर सोडू नका, असं सांगून भागणार नाही ! -आ.मेटेंचा मुख्यमंत्र्यावर घणाघात..

ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी..शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांची मागणी

चिखल तुडवत आमदार मेटे साहेब थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

बीड । : मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आल्याने शेतकऱ्यांचं अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधवांचं उभं पीक वाहून गेल्याचं आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहे.शहरातील व ग्रामीण भागातील
रस्त्याचे व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करुन सॅटलाईटद्वारे उपलब्ध असलेल्या नुकसानीच्या माहितीच्या आधारे तातकाळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, उडदाचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्ण अडचणीत आलेला असून शेतीचे नुकसान झालं आहे. शेत पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता साधारणतः चार-पाच वर्षे तरी जमीन व्यवस्थित होणार नाही, अशी परिस्थिती आहे. खोलीकरण नसल्यामुळे पाणी सगळ्या शेतांमध्ये आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, असे आवाहन आ.विनायकराव मेटे यांनी केली आहे.
आजपासून पुढील दोन दिवस आ.मेटे हे बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करत आहेत.घोडका राजुरी ता. जि. बीड येथील मुख्य रस्त्यावरील पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला आहे त्यामुळे ग्रामस्थांना खुप अडचणी येत आहेत त्यानुषंगाने आज आ. विनायकरावजी मेटे यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व ग्रामस्थांना वाहून गेलेला पूल पुन्हा केला जाईल,असे आश्वासन दिले. सन- 2018-19 मध्ये हा पुल आ.मेटे यांनी नाबार्ड अंतर्गत मंजूर करून दीड कोटी रुपये मंजूर केले होते परंतु हे महाविकास आघाडीचे सरकार आल्याबरोबर त्यांनी हे काम रद्द केले आज तो पूल पूर्णत्वास गेला असता तर तेथील ग्रामस्थांना ञास सहन करण्याची वेळ आली नसती. मागील कांही दिवसांपासून राज्यात कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना आधाराची गरज आहे.शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तात्काळ मदतीची घोषणा करणे अपेक्षीत आहे. अशावेळी मा.मुख्यमंत्र्यांनी फक्त गोड गोड बोलून आणि धीर सोडू नका, असं सांगून भागणार नाही. पावसामुळे राज्यात प्रचंड शेती आणि मालमत्तेचं नुकसान झाले आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जनावरं वाहून गेल्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडल्या. यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे राज्यात 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.मुख्यमंत्र्यांनी ही सगळी परिस्थिती गांभीर्याने घेऊन तात्काळ मदतीची घोषणा करायला हवी,शासनाकडे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा सॅटॅलाइट डाटा उपलब्ध आहे,नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा
त्यांना थेट मदत दिली पाहिजे. त्यमुळे उगाच पंचनाम्यात वेळ घालवू नये. कारण मागील वेळी पंचनामे केलेली रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. कागदी घोडे नाचविण्यात काहीही अर्थ नाही,असा आ.विनायकराव मेटे यांनी मा.मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.या पाहणी दरम्यान जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, युवक जिल्हाध्यक्ष रामहारी मेटे, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे , सुनील शिंदे, ज्ञानेश्वर कोकाटे राजेंद्र आमटे, राजेंद्र माने ,सुनील कुटे, महादेव बागलाने ,डॉ. राजेंद्र बंड,विनोद कवडे , पदाधिकारी ,कार्यकर्ते व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा