सुरु झालेल्या शाळेत शिक्षण विभागच घालतंय खोडा!चालू झालेल्या शाळा बंद पडण्याचा उचलला विडा!!




 

एक शिक्षक मयत तर एक शिक्षक, एक लिपिक व दोन शिपायांच्या गटविकास अधिकाऱ्याने केल्या बदल्या

अन्यथा शाळेला कुलूप लावण्याचा शिक्षण समितीचा इषारा !

शिरूर कासार ।  गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीत बंद पडलेल्या शाळा मोठ्या कष्टाने कशा बश्या चालू झाल्या,शाळेपासून दुरावलेली मुले पहिल्याच दिवसापासून चांगल्या उपस्थितीने शाळेत आली मात्र शिरूर कासार येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाला कोरोना महामारीत आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा अजून एक शिक्षक, लिपिक, व दोन शिपायांना अचानक दुसरीकडे पाठवण्यात आल्याचे गटविकास अधिकारी यांनी आदेश काढून नेमका चालू झालेल्या शाळा बंद करण्याचा हा डाव खुद्द गटविकास अधिकारीच करत असल्याने शिक्षण विभाग खोडा घालतंय की काय असा प्रश्न पालक व शिक्षण प्रेमींना पडू लागला आहे.रिक्त जागा न भरल्यास शालेय शिक्षण समितीने थेट शाळेला कुलूप लावण्याचा इषारा दिला आहे .

मार्च २०२० मध्ये अचानक ऐन परीक्षा चालू असतांना कोरोना महामारीचा शिरकाव भारतात झाला व साऱ्या जगालाच टाळे लागल्या त्यात चालू असलेल्या परीक्षा व होणाऱ्या परीक्षा रद्द करून सारा देशाचं बंद झाल्याने शाळाही बंद झाल्या मात्र जसा जसा कोरोना संसर्ग कमी होऊ लागला तसं तसा शासनाने गेल्या चार ऑक्टोबर पासून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागतही झाले. कोरोनाचे सर्व शासन नियम पाळून शाळा सुरु झाल्या मात्र शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्याने आपल्या मर्जीतील लोंकांचे त्यांना सोयीच्या होतील अश्या ठिकाणी नियुक्त्या देऊन येथील जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा बंद करण्याचा इरादा आहे की काय असा संशय सर्व सामान्यांना पडल्या शिवाय राहत नाही. गेल्या जुन पासून शाळा चालू नव्हत्या तरी शिक्षकांना ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी शाळेत हजर राहाणे बंधन कारक होते मात्र बरेच शिक्षक नौकरीच्या ठिकाणी राहत नसल्याने अधिकाऱ्याच्या मर्जीने वाटेल तेव्हा शाळेत येत होते.त्याचं काळात दोन शिपायांना तात्पुरत्या स्वरूपात कोरोना असल्याने आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आले.तर लिपिक काम गटशिक्षण अधिकाऱ्याकडेचं करत आहे तर एक शिक्षक जून पासून भरारी पथकात दिल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी आदेश काढले असून एक शिक्षक कोरोना काळात आपली सेवा बजावतांना मयत झाले असून त्यात तीन महिन्यापूर्वी शाळेला शिपाई अगोदरच कमी असून तत्कालीन गटविकास अधिकाऱयाने पशु वैद्यकीयला बदली केली तर काल परवा अजून एका शिपायाला गट शिक्षणाधिकाऱ्याच्या कार्यालयात पाठवण्याचे आदेश दिले. या जिल्हा परिषदेच्या शाळेत जवळपास तीस वर्ग खोल्या असून प्रत्येक मजल्यावर शौचालय, मुताऱ्या सहा ठिकाणी आहेत त्या साफ कुणी करायच्या हा प्रश्न असून अश्याने कोरोना पेक्षा शाळेत झालेल्या घाणीनेच जास्त विद्यार्थी आजारी पडण्याची भीती पालकातून व्यक्त होत आहे. सध्या पटसंख्या ५०० च्या पुढे असून माध्यमिक साठी फक्त चार शिक्षक कार्यरत असून विषय मात्र सहा आहेत तर प्राथमिक पदवीधर म्हणजे शिक्षणाचा मुख्य गाभाचं रिकामा असून पाच जागा असतांना इथे दोन रिकाम्या आहेत तर प्राथमिक साठी सात शिक्षक कार्यरत आहेत.तर लिपिक व एक शिपाई गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे असल्याने कार्यालयीन कामकाज शिक्षकांना करावे लागतं असून त्यामुळे अजून एक शिक्षक शिकवण्याचे काम सोडून त्याना कार्यालयीन कामकाज पाहावे लागते.समायोजनात अतिरिक्त झालेले शिक्षक या ठिकाणी देण्या ऐवजी जिथे कमी असतील तेथील शिक्षक देऊन नेमके कुणाचे हित हे अधिकारी साधतं आहेत हे मात्र कळायला कुणा जोतिषाची गरज भासणार नाही.यांना नेमकी जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा खिळखिळी करायची आहे का असा प्रश्न यावरून पडल्याशिवाय राहत नाही.तात्काळ या शाळेतल्या रिक्त झालेल्या जागा भरा नसता कायमच शाळेला कुलूप लागल्या शिवाय राहणार नाही अशी मानसिकता येथील पालकांनी व्यक्त केली असून तात्काळ या नियुक्त्या रद्द करून रिक्त मुख्याध्यापक, एक शिक्षक व दोन शिपाई द्यावेत अशी विनंती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष युवराज सोनवणे, कदिर शेख, तुकाराम कातखडे, राजू काटे, कैलास गायके,जमीर बागवान, बाळू बोराडे, सतिष मुरकुटे यांनी केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा