दीपावली निमित्त नवीन कपडे वाटप करत पालवरील मुलांची दिवाळी केली “गोड”




गरजू कुटुंबीयांला नवीन कपडे देऊन आर्यन फाउंडेशनचा दीपोत्सव साजरा !

नेकनूर ।  (प्रतिनिधी ) :- वंचित गरजू कुटूंबाच्या मदतीसाठी मागच्या काही वर्षांपासून मदतीचे दातृत्वचे घेतलेल्या लिंबागणेश येथील राम फाळके हे कपडे असो की किराणा असो की अन्य कुठलीही मदत असो त्यांच्या मदतीचा वसा सुरूच असून आज दीपावली निमित्तनेकनूर येथील शासकीय अध्यापक विद्यालय जवळील पालावरील लहान मुलांना कपड्याची आवश्यकता असल्याची बाब आर्यन फाऊंडेशनचे राम फाळके यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ येथील मुला मुलींना नवीन ड्रेस रविवारी सकाळी हभप नाना महाराज कदम यांच्या हस्ते मदत देत “राम” फाळके यांनी वंचितांची दिवाळी गोड केली.

दीड वर्षापासून वंचित गरजू कुटुंबापर्यंत लिंबागणेश येथील राम फाळके यांचा मदतीचा यज्ञ नित्याने सुरू आहे . मागच्या वर्षभरात जिल्ह्याच्या मदतीच्या यज्ञात राम फाळके हे नाव अनेकदा दिसून येत होते . भाकरी बनवून देणे असो ,किराणा वाटप असो की, कपडे असो की , दारात कोणीही नडलेला आला तर राम ची मदत होणारच या पलीकडे त्यांनी नेकनूर येथील अध्यापक विद्यालया जवळ वास्तव्यास असणाऱ्या पालातील लहान मुलां मुलींना नवीन कपडे वाटप करत असतांना वंचितांच्या मदतीचा त्याचा हा प्रवास हजारो कुटूंबा पर्यत पोहोचला आहे.

पालवरील लहान मुलांना कपड्यांची आवश्यकता असल्याची बाब लक्षात येताच येथील लहान मुला मुलींना कपडे देण्यासाठी राम यांचे आर्यन फाऊंडेशन पुढे आले रविवारी त्यांनी दिवाळीचे औचित्य साधत राम यांनी त्यांची दिवाळी गोड करत ह भ प नाना महाराज कदम यांच्या हस्ते नवीन कपड्याचे वाटप करण्यात आले यावेळी डॉ गणेश ढवळे , राम फाळके, पत्रकार अशोक शिंदे, मनोज गव्हाणे , रामनाथ घोडके, सुरेश रोकडे, निलेश भटे, विष्णू साबळे, पांडुरंग घरत, वाल्मीक फाळके, बाबू आबदार इत्यादी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा