सर्वसामान्य नागरिक उपाशी पोटी मरायलेत , आता तरी आठवडी बाजार भरवा- भारत काळे 




नेकनूर चा आठवडी बाजार सुरू करण्यासाठी नेकनुरच्या सरपंचा सह अनेक गावच्या ग्रा. पं चे जिल्हाधिकारी यांना निवेदन
नेकनुर ।
बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार नेकनूरमध्ये भरतो.कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून आठवडी बाजार बंद असल्याने शेतकरी आणि सर्वसामन्यांचे अर्थकारण बिघडले आहे .या आठवडी बाजारातून लाखोंची उलाढाल होत .मात्र बाजार बंद असल्याने ही उलाढाल बंद झाली असून यामुळे अनेक सर्वसामान्य  नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आसून राज्यात सर्व व्यवहार सुरळीत झाले असताना आठवडी बाजारच निर्बंधात का ? असा प्रश्न उपस्थित करत सामाजिक कार्यकर्त्यांनी आठवडी बाजार भरवण्यासाठी रास्ता रोको आंदोलन , उपोषण , आक्रोश मोर्चा काढून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता आता त्यानंतरही आठवडी बाजार सुरू करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला नसल्याने आता नेकनूर परिसरातील अनेक ग्रामपंचायतने  जिल्हाधिकारी यांना आठवडी बाजार सुरू करण्यासाठी निवेदन दिले आहेत.
बाजारावर अवलंबून असणारे छोटे व्यवसायिक पूर्णपणे डबघाईला आले असून त्यांचे उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्याने त्यांची उपाशी पोटी मारण्याची वेळ आली असल्याने ते  आर्थिक संकटात सापडले आहेत. बाजार बंदमुळे  जनावरांची खरेदी-विक्री करताना शेतकरी वर्गाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे . त्याचप्रमाणे काही निकष पाळून आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी सुद्धा अनेक वेळेस सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती तरीही प्रशासनाने या बाबत काहीच निर्णय घेतला नाही.
आठवडी बाजारात गर्दी होते पण सध्या सभा, मोर्चे , मेळावे आठवडी बाजारापेक्षा मोठया प्रमाणात भरत आहेत पण आठवडी बाजारा बाबतच निर्बंध याला सर्वसामान्याचे दुर्दैव म्हणावे लागेल परंतु याला भविष्यात काही पर्याय काढत आठवडे बाजार सुरू करणे गरजेचे आहे. नसता छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची येईल असे दिसून येत आहे.
 मराठवाडय़ातील सर्वात मोठा असलेला , बीड जिल्ह्य़ातील नेकनुर येथील आठवडी बाजार गेल्या दीड वर्षा पासून बंद असल्याने शेतकरी , हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे ,  व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. व शासनाने जवळपास सर्वच अस्थापना सुरू केले आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी पुणे जिल्ह्य़ातील आठवाडी बाजार सुरू करण्याचे आदेश दिले आहे. याच धर्तीवर बीड तालुक्यातील नेकनूर येथील आठवडी बाजार सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य भारत काळे , ग्रामपंचायत सदस्य चक्रधर शिंदे, सतीश मुळे, फुलचंद काळे, राकेश शिंदे, सफेपुर चे सरपंच श्री राम घोडके तसेच साखरे बोरगाव , उदंडवडगाव , मांजरसुंबा , कुंभारी , बाळापुर , भंडारवाडी , कळसंबर ,या गावच्या ग्रामपंचायत ने बाजार सुरू करण्यासाठी निवेदन दिले आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा