तरुण पिढीने उद्योग व्यवसायातून स्वावलंबी व्हावे – ओमप्रकाश शेटे




ओमप्रकाश शेटे यांचा सपत्नीक तलवाडा नगरीमध्ये सत्कार सोहळा

तलवाडा ( प्रतिनिधी ) :-

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र ओमप्रकाश शेटे यांची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तलवाडा येथील समर्थकांच्या वतीने ओमप्रकाश व सौ. शिल्पाताई शेटे यांचा सत्कार करण्यात आला. राजकारण हे कधीही जीवन जगण्याची साधन होऊ शकत नाही म्हणून तरुणांनी स्वतः चे उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वावलंबी व्हावे असे आवाहन ओमप्रकाश शेटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबू आप्पा शेटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तलवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, दिलीप, शेटे,गोपाल शेटे ,महेश शेटे,उपस्थित होते. पुढे बोलताना ओमप्रकाश शेटे म्हणाले की, येणारा काळ सर्वार्थाने कठीण असणार आहे. त्यामुळे तरुण पिढीने कुठलाही झेंडा हातात घेऊन आपापसात वैर घेऊ नये. सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदणारा भारत हा जगाच्या नाकाशावरील एकमेव देश आहे. तेव्हा देशाच्या पंतप्रधानांचे अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवावी असे आवाहनही त्यांनी केले.
आजच्या राजकारणावर भाष्य करतांना शेटे म्हणाले की, राजकारणात कुणी कुणाचे कायमचे मित्र अथवा शत्रू नसतात. त्यामुळे ज्या ज्या वेळेस निवडणुका लागतात त्यावेळेपुरते राजकारण करावे. कारण राजकारण हे चरितार्थ चालवण्यासाठी पुरेसे नसते. त्यामुळे तरुण पिढीने जास्तीत जास्त शिक्षणावर भर द्यावा आणि स्वतःचे ध्येय साधण्यासाठी प्रयत्न करावा.
मागील दोन वर्षांमध्ये कुठल्याही पदावर नसताना देखील आपण अनेक रुग्णांना मदत मिळवून दिली. कुठल्याही गोरगरिबांना वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वासही शेटे यांनी दिला. मागच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून काम करण्याची संधी मला मिळाली त्यामुळेच गरजवंताला आपण मदत करु शकलो असेही ते म्हणाले. यापुढेही अशीच जनसामान्यांची सेवा करण्याचे बळ देवी त्वरितामातेने द्यावे यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आपण आले असल्याचेही शेटे म्हणाले. यावेळी डॉ,राम धुमक, विजय डोंगरे सर,सरपंच सुंदर तिवारी, प्रितम गर्जे,शहेनशाह सौदागर,शाम कुंड, गोविंद जोशी, मुबीन खतीब,नजीर कुरेशी, दत्ता हात्ते,शंकर नाटकर, दिलीप नाटकर,आर, आर, आबा, शेख नाजेर, इस्राईल पठाण,ईजु शेख,आसलम सौदागर, मस्जिद कुरेशी,रिजात शेख,आमर वांदे,नयुम बागवान,जावेद कुरेशी,बाळु गिरी, सहेबाज,फेरोज पठाण, पत्रकार विष्णू राठोड,सचीन डोंगरे, अशोक सुराशे, रफिक कुरेशी, महादेव वाघमारे,सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
पत्रकार अल्ताफ कुरेशी ,डॉ सुरेश गांधले , विक्रम लाड, दादाराव रोकडे,तोसिफ कुरेशी, सय्यद पाशा, इम्रान कुरेशी, इरफान कुरेशी, ठखाराम सुरासे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.सुत्रसचलन डॉ सुरेश गांधले, प्रस्ताविक पत्रकार अल्ताफ कुरेशी, आभार प्रदर्शन परमेश्वर यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा