दांपत्यास लुटलेल्या आरोपीला केले जेरबंद




 

नेकनूर (प्रतिनिधी):-अक्कलकोटवरून बीडकडे येणाऱ्या एका दांम्पत्यास चोरट्याने चौसाळ्याजवळ लुटून त्यांच्याकडील सोन्या – चांदीसह इतर ऐवज लुटला होती . या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी या प्रकरणाचा छडा लावला . यातील एका आरोपीला कळंब तालुक्यातल्या मोहा येथून ताब्यात घेतले आहे .

नम्रता धनुरे ही महिला आपल्या पतीसमवेत अक्कलकोटवरून बीडकडे मोटर सायकलवर येत होती . चौसाळ्याजवळ चोरट्याने त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना धमकावून त्यांच्या जवळील सोन्याच्या दागिन्यासह इतर रक्कम लुटली होती . या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता . या प्रकरणाचा छडा पोलीस प्रशासनाने लावला आहे . सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत , सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख , विलास जाधव , दिपक खांडेकर , प्रशांत क्षीरसागर , राठोड ढाकणे , अनवणे , कांबळे यांनी कळंब तालुक्यातल्या मोहा येथील शहाजी काळे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले . सदरील या आरोपीने या दांम्पत्यास लुटले असल्याचे सांगण्यात आले . त्यात अन्य काही आरोपी असल्याचे सांगण्यात येते .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा