निवडणुका जवळ आल्या की क्षीरसागरांसोबत साटेलोटे असलेले भाजपचे आ.विनायकरावजी मेटे नुसत्या आरोपांचा फराळ जनतेला खाऊ घालतात – अशोक येडे




 

आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांचा आरोप

बीड ( प्रतिनिधी)- भाजपच्या चिन्हावर आमदार असलेले मा. विनायक मेटे हे बीड जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक आली की आरोपांच्या माध्यमातून चर्चेत येणारे नेते आहेत. या नेतृत्वाने आतापर्यंत विधायक काय कार्य केले आहे हा संशोधनाचा विषय असून निवडणुका जवळ आल्या की क्षीरसागरांसोबत साटेलोटे असलेले भाजपचे आमदार मा. विनायक मेटे नुसत्या आरोपांचा फराळ जनतेला खाऊ घालतात, असा आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांनी केला आहे.
बीड नगरपरिषद निवडणूक आल्यामुळे आज आरोप करणारे आमदार मा.मेटे साहेब हे स्वतःच क्षीरसागरांचा पाहुणचार नगरपरिषदेत जाऊन स्वीकारतात. बीडच्या नगराध्यक्ष यांचे मित्र असलेले आमदार मेटे यांनी आरोप करताना आपणच त्यांना संरक्षण देत आहोत हे विसरून कसे चालणार आहे? विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत करणारे आमदार मा. विनायक मेटे साहेब हे बीड शहराला बकाल करणाऱ्या क्षीरसागरांना अप्रत्यक्ष मदत करत असतील हे कसे नाकारता येईल? शिवसंग्राम नावाने जनतेला वेड्यात काढताना भाजपचे आमदार जनतेला किती दिवस वेड्यात काढणार आहेत? बीड जिल्ह्यात बहुजनांच्या मुलांना राजकारणात आणून देशोधडीला लावण्याचे सर्वाधिक काम आमदार विनायक मेटे यांनीच केलेले आहे. चारदोन संघटना, संस्थांचे प्रतिनिधी हे अमिश दाखवत जमवून आपल्या मागे लोकमत असल्याचा देखावा जास्त दिवस टिकणारा नाही. आम आदमी पार्टी आशा नेत्यांपासून सर्वांनी सावध राहावे असे आवाहन करत असल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी प्रशीद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा