गंभीर गुन्ह्यातील दोघांना जामीन मंजूर – ऍड.नेहरकर




गंभीर गुन्ह्यातील दोघांना जामीन मंजूर – अॅड. तेजस नेहरकर

बीड (प्रतिनिधी) प्रस्तुत प्रकरणात दिनांक 14/11/ 2019 रोजी फिर्यादीचे फिर्यादीवरून दोन्ही आरोपींचे विरुद्ध फिर्यादीच्या पतीला अतिगंभीर मारहाण करून गळ्यातील सोन्याचे तोडुन व विनयभंग करुन आणि जीवे मारण्याची धमकी दिली आशा आशयाची फिर्याद अंभोरा पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती.
सदरील प्रकरणात गुन्ह्याचा तपास करून तपासीय अधिकारी यांनी आरोपींना अटक केली होती. आरोपींना अटक करून मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब आष्टी यांच्यासमोर हजर केले होते. आरोपीचा जामीन मा. न्यायालयाने आष्टी येथे नामंजूर केला होता. त्यामुळे आरोपींनी जामीन मिळावा म्हणून अॅड. तेजस सुभाष नेहरकर यांच्यामार्फत मा. जिल्हा न्यायालय बीड यांच्याकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सदरील प्रकरणात सरकारी पक्षाचा युक्तिवाद व बचाव पक्षाचा उत्कृष्ट युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना जामीन मंजूर केला. या गंभीर प्रकरणाकडे आष्टी तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागले होते. या प्रकरणात आरोपी तर्फे अॅड. तेजस नेहरकर यांनी भक्कम बाजू मांडली व गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपीला जामीन मिळवून दिल्याबद्दल अॅड. तेजस नेहरकर बीड यांचे आष्टी तालुका सहित सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा