फुलेंचा वारसा जपणाऱ्या शिक्षकांना मुप्टाचा आदर्श पुरस्कार – ठोंबरे




 

बीड । राष्ट्राच्या एकात्मते करिता क्रांतीबा ज्योतिबा फुले यांनी समतेची शिकवण दिली. धर्म, पंथ, जात, वर्ण भेद, उच्च-नीच अशा अनेक संकटाच्या विळख्यात भारतीय समाज व्यवस्था अडकलेली असताना महात्मा फुले यांनी क्रांतीची बीज रोपण केले, हे सर्व करताना त्यांनी शिक्षणावर कायम भर दिला. अगदी वयाच्या 21व्या वर्षी मुलींची पहिली शाळा पुणे येथे सुरू करून स्त्री- पुरुष समानते बरोबरच स्त्री मुक्तीचा लढा उभा केला. समाजातील प्रत्येक घटकांची बौद्धिक क्षमता ही केवळ शिक्षणाने परिपक्व होऊ शकते हा विचार अंगिकारून आदर्श शिक्षण व्यवस्था उभी केली, आणि प्रथम एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले. त्याच कार्याच्या पाऊल खुणा जपत आज समाजातही अनेक शिक्षक ज्ञानार्जनाचे कार्य करत आहेत. आणि त्यांच्या आदर्श कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याला शुभेच्छा व गती प्राप्त होवो, याबाबत बीड जिल्हा मुप्टा “क्रांतीबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” देत आहे.असे मत बीड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी मा. तुषारजी ठोंबरे साहेब यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर असोसिएशन (मुप्टा) जिल्हा बीड च्या वतीने क्रांतीबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2021. तुलसी इंग्लिश स्कूल, संत ज्ञानेश्वर नगर, बीड येथे दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते आपले मत व्यक्त करत होते. बीड जिल्हा मुप्टा च्या वतीने पुरस्कार देण्याचे हे 13 वे वर्ष असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. प्रदिप रोडे (अध्यक्ष, देवगिरी प्रतिष्ठान बीड), प्रमुख अतिथी मा. विक्रम सारूक (शिक्षणाधिकारी बीड), प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर (वृत्तपत्र विभाग, स्वा रा ती विद्यापीठ नांदेड), प्रा. सुनील मगरे (मुप्टा, संस्थापक सचिव), मा. संदीप उपरे (अध्यक्ष, ओबीसी परिषद महाराष्ट्र राज्य), प्रा. डॉ. संभाजी वाघमारे (विभागीय अध्यक्ष, मुप्टा), प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे (विभाग अध्यक्ष, स्वा रा ती नांदेड), प्रा. रवी सुरवसे (जिल्हाध्यक्ष, मुप्टा उस्मानाबाद), मा. शिवराम मस्के (राज्याध्यक्ष,विनाअनुदानित विभाग मुप्टा), मा. शाहेद कादरी (सचिव, उर्द मुप्टा महाराष्ट्र राज्य) प्रा. डॉ. भास्कर टेकाळे( विभागीय कार्याध्यक्ष, औरंगाबाद), डॉ. समिउल्ला खान (राज्याध्यक्ष, उर्दू मुक्ता), प्रा. राम गायकवाड (कार्याध्यक्ष, मुप्टा बीड) प्राचार्य प्रदीप गाडे,( जिल्हाध्यक्ष, प्राचार्य विभाग मुप्टा बीड)प्रा. राम गव्हाणे( जिल्हा सचिव मुप्टा बीड), मा. शरद नगर (जिल्हाध्यक्ष, प्राथमिक विभाग मुक्ता बीड),मा. प्रवीण तरकसे( जिल्हाध्यक्ष माध्यमिक विभाग मुप्टा बीड) प्रा. बाळासाहेब गव्हाणे (विभागीय कार्याध्यक्ष मुप्टा बीड),मा.श्रीकांत वारभवन (जिल्हा सचिव, माध्यमिक विभाग मुप्टा बीड), शेख अजीज राजा (जिल्हाध्यक्ष उर्दू मुप्टा बीड), मा. शैलेश चिलवंत (जिल्हा सचिव, प्राथमिक विभाग मुप्टा बीड),प्रा. शशिकांत जावळे (जिल्हा समन्वयक मुक्ता बीड) आदींसह उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मा. ठोंबरे साहेब म्हणाले की, देशाचा खरा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आहे. महापुरुषांच्या विचारधारेचा क्रांतीचा निखारा कायम उब देत आहे. महापुरुषांची विचारधारा हा, समाजाच्या उन्नतीचा व प्रगतीचा मार्ग आहे. क्रांतीच्या धुरा तेंव्हाच जिरतात, जेंव्हा प्रश्न निर्माण होताना विरघळून जातात. राष्ट्राची शिक्षण व्यवस्थाच राष्ट्राच्या विकासाचे कारण बनू शकते. तेंव्हा शिक्षण व्यवस्थाच सर्वांगीन विचाराने मजबूत बनवणे असणे आवश्यक आहे. स्वतंत्र भारतात 75 वर्षांनीही शिक्षकांना प्रिव्हिलेज्ड टीचर असोसिएशन करावे लागते ही खेदाची गोष्ट आहे. प्रत्येक वेळी मार्गक्रमण करताना त्या-त्या प्रवासात ध्येय असावे, केवळ ध्येयापुरताच प्रवास असू नये. प्रत्येक ठिकाणी जे लोक नियमित एकत्रित येतात त्यांचा पराभव कधीही होत नाही, करिता समाजहिताच्या बाबत ज्योतिबा फुले यांचा समतेचा विचार व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेला समतेचा व बंधुत्वाचा विचार अंगीकारणे आवश्यक आहे. श्रमिक, कष्टकरी, मजूरदार, शेतकरी या सर्वांच्या व्यथा लक्षात घेऊन, त्यांच्या कष्टाची व मोलाची कदर करून, त्यांना न्याय देण्याचे कार्य क्रांतीबा फुले यांनी केले. स्वार्थ आणि भीती या दोन गोष्टीला तह देऊन त्यांनी आपले कार्य अखेरपर्यंत सुरू ठेवले. म्हणूनच त्यांना आपले कार्य सक्षम पणे करता आले. तेच फुलेंचे कार्य करत जे पुढे जात आहेत, त्यांना जर मागे असलेल्या समाजाची व व्यक्तींची जाणीव होत नसेल तर क्रांतीच्या विचारांची प्रेरणा सांगणे व सांभाळणे हे सर्व निरर्थक असेल, असा सल्लाही दिला. प्रसंगी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
कोरोना संकट काळात कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणाची आहुती देणारे व उमर फारुक उर्दू हायस्कूल, पाथरी. जिल्हा परभणी चे मुप्टा सदस्य, शिक्षक सिद्दिकी मुजाहेद यांच्या दोन मुलींच्या नावे एफ. डी.(FD) करून आर्थिक मदत करण्यात आली.पैकी बीड जिल्हा मुप्टा तर्फे 81000. रु.चा तर बीड जिल्हा उर्दू मुप्टा तर्फे 115200. रुपयाचा एफ.डी धनादेश त्यांच्या परिवारातील सदस्यांना प्रमुख उपस्थितांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून पुरस्कार प्राप्त शिक्षक विकास कुंडलिक विधाते. रमेश ज्ञानोबा गाडे. राजीव लक्ष्मण मुंढे, मधुमती ज्ञानेश्वर दुगम, किर्तिकुमार सिताराम मोरे, भारत धोंडीबा काळे, संतोष रामभाऊ गायकवाड, रविंद्र भाऊराव बागुल, रत्नाकर छबु डोंगरे, प्रकाश घनश्याम कांबळे, गौतम केरबा गायकवाड, अब्दुल कलाम मकबूल अहमद, जावेद पाशा शेख, उत्तम भाऊराव पारखे, अशोक उद्धव नारनवरे, असे एकूण पंधरा शिक्षक उपस्थित होते. त्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन अतिथींच्या हस्ते यथोचित सहपरिवार सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी तुलसी शैक्षणिक समूहातील सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी बीड जिल्हा मुप्टा सदस्य, पदाधिकाऱ्यांसह मुप्टावर प्रेम करणारे अनेक शिक्षक- शिक्षिका सामाजिक क्षेत्रातील कर्मचारी व चाहते उपस्थीत होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा