पीएम  किसान योजनेच्या शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यामध्ये 2 हजार रुपयांची रक्कम मिळणार




नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याची प्रतिक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (14 मे) सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर ते पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणार आहे. या कार्यक्रमामध्ये आपण pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून संपर्क साधू शकता. पीएम
किसान योजनेच्या शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यामध्ये 2 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे . नरेंद्र मोदी 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 19 हजार कोटी रुपये वर्ग करतील. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 7 हप्त्यांमध्ये 14 हजार मिळाले आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. पहिल्यांदा 3 कोटी 16 लाख 5
हजार 539 शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 कोटीहून अधिक शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. डिसेंबरमध्ये जाहीर केलेला हप्ता 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱ्यांना देण्यात आला. आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्यात जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. यावेळी केंद्र सरकारने एकूण 10 कोटी 48 लाख 95 हजार 545 शेतकर्‍यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवण्यात आले होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा