भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जागेतील पत्त्याच्या कलबवर छापा




 

47 आरोपींना पकडले .मोबाईल, वाहने, जप्त.

सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केली दबंग कारवाई!

बीड । शहरालगतच्या चऱ्हाटा फाटा परिसरातील तुकाराम गुरूजी नगरमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेत चालणाऱ्या पत्त्याच्या क्लबवर दि . २८ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने अचानक छापा मारला . यामध्ये जवळपास ४७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे . त्यांच्याकडील मोबाईल आणि या क्लबसमोर असणारे जवळपास सर्वच वाहने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत . ही कारवाई सकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण होईल असे पोलिस सुत्रांनी सांगितले . मात्र पोलिसांनी प्राथमिक माहिती देताना सदरील क्लब हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तुकाराम मस्के यांच्या मालकीच्या जागेत चालवला जात असल्याचे सांगितले . काही दिवसापूर्वीच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता . त्यानंतर आता भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जागेत असलेल्या क्लबवर छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा