माफियाकिंगला  राजकीय प्रतिष्ठा कुणी दिली ? रमेश पोकळेच्या पोस्टने खळबळ!




माफियाकिंगला  राजकीय प्रतिष्ठा कुणी दिली.?
रमेश पोकळेच्या पोस्टने खळबळ !!
बीड (मराठवाडा पत्र न्यूज):- मध्ये अवैध धंदे व त्यात असलेले राजकीय नेते समोर येताना पाहून लोकांनी कपाळी हात मारून घेतला आहे . भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे नाव एका क्लब रेड मध्ये आल्या नंतर चर्चेने जोर धरला असून दरम्यान भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष रमेश पोकळे यांनी केलेल्या एका पोस्ट ने चांगलीच खळबळ उडालेली आहे , त्यांच्या पोस्ट मध्ये जरी कुणाचे नाव नसले तरी त्यांचा रोख बहुतेकांना न समजण्याइतका क्लिष्ट नाही .
 रमेश पोकळे यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे  ” बीड जिल्ह्यातील अवैध धंदे व माफियागिरी कडे डोळेझाक करणारे प्रशासकीय अधिकारी जेवढे जिम्मेदार आहेत…तेवढेच माफिया किंगला प्रोत्साहन देणारे समाज घटक व सर्वपक्षीय राजकीय नेते देखील जबाबदार आहेत बीड जिल्ह्यात सर्वच क्षेत्रातील माफियाकिंग व नंबर दोन चे अवैधं धंदे ( मटका,गुटका,बनावट दारू निर्मीती व विक्री,अवैद्य गौण खनिज खरेदी विक्री.. ) याकडे डोळेझाक करणारे पोलिस अधिकारी जेवढे जिम्मेदार आहेत तेवढेच.. या माफियाकिंगला व अवैध धंदे करणारे यांना सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा मिळवून देणारे सर्व समाज घटक व प्रोत्साहन देणारे सर्वपक्षीय नेते हि जबाबदार आहेतच हे भयान वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही.”  या भावना व्यक्त करून त्यांनी आपला रोख लोकाभिमुख केला आहे .
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा