धारूर मध्ये भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन जास्तीत जास्त संघानी सहभाग नोंदवावा – विश्वास शिनगारे




धारूर मध्ये भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन जास्तीत जास्त संघानी सहभाग नोंदवावा – विश्वास शिनगारे

किल्ले धारूर ।

किल्ले धारूर शहरात शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजक विश्वास शिनगारे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके व जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती जयसिंग सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 15 जानेवारी रोजी किल्ले धारूर शहरात भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक भागवत दराडे यांच्याकडून 11111 रुपये दुसरे पारितोषिक साईनाथ कोमटवर 5555 रुपये तर तिसरे पारितोषिक 3333 कै.वसंतराव कुंभार यांच्या समर्थनाथ ठेवण्यात आलेले आहे तसेच वैयक्तिक चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूसाठीहि बक्षीस या स्पर्धेत असणार आहेत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिनांक 14 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सहभाग नोंदवू इच्छिनाऱ्या संघाने आपल्या संघाची नोंद करणे गरजेचे आहे. संघाची नोंदणी करण्यात साठी 201 रुपये फीस असणार असून स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी अंकुश कदम 7620480882, भैया साखरे 7709313340, सागर इखे 8329854341, विशाल बहिरे 9503535152 यांच्याशी संपर्क साधावा ही स्पर्धा शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील मैदानावर संपन्न होणार आहे तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त संघाने सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजक विश्वास शिनगारे व किल्ले धारूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा