आजाद समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी आशिष कुमार चव्हाण यांची निवड




 

बीड । प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये आशिषकुमार चव्हाण यांना बीड जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. बैठकीला प्राचार्य सुनील वाकेकर ( राज्य महासचिव), सिद्धार्थ शिनगारे ( राज्य मुख्यसंघटक) यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आशिषकुमार चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की ” आजाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भाई चंद्रशेखर आजाद यांच्या आदेशानुसार पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी माझी निवड केल्या बद्दल आभार ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. बीड जिल्ह्याच्या प्रत्येक गावांमध्ये शाखा गठित करण्यात येतील आणि पार्टीची ताकद वाढवण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनकर्ती जमात बनणे हा उद्देश घेऊन आजाद समाज पार्टी देशभर कार्य करत आहे. याच उद्देशासाठी बीड जिल्ह्यामध्ये जनाधार वाढवणार असे सूचक वक्तव्य जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आशिष कुमार चव्हाण यांनी केले. या वेळी प्रमोद अण्णा शिंदे ,नाना कांबळे ,संदेश डोळस,,किरण बोराडे ,प्रताप धनवे,अफरोज अत्तार,पँथर सेने चे मराठवाडा उपाध्यक्ष नितीन सोनवणे,लहुजी विकास परिषदेचे विजय चांदणे,पत्रकार शरणागत,कुणाल बोराडे,आकाश कांबळे,भारत अण्णा कांबळे, आदिंची उपस्तीती होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा