शाळा-महावद्यालये नियम व अटींसह सुरू कराव्यात ; स्कुल चले हम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 




 

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे आणि शिक्षणप्रेमी मनोज जाधव यांचे आंदोलन.
बीड।
सतत शाळा बंद असल्यामुळे विदयार्थ्यांचे बौद्धिक, शारिरीक आणि मानसिक खच्चीकरण होत असून भावीपिढी दिशाहीन होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रात काम करणा-या तज्ञांनी व्यक्त केली असून विषाणु संसर्ग नसताना देखील ग्रामिण भागातील सरसकट शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय शिक्षणाच्या व विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोणातुन चुकीचा ठरत असल्याचे मत पालकांचे असुन शाळा बंद या निर्णयाचा फेरविचार करून शासनाच्या कोरोना विषयक अटी व नियमांचे पालन करून शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी जोर धरत आहे, यामुळेच सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शिक्षण हक्क आधिकार क्षेत्रात काम करणारे मनोज जाधव यांच्या पुढाकाराने उद्या दि.१७ जानेवारी सोमवार रोजी जिल्हाधिकारी बीड कार्यालयासमोर “स्कुल चले हम आंदोलन “पुकारण्यात आले असून कोरोना नियम व अटींसह सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात हनुमंत भोसले, महासचिव (राज्यसचिव)महाराष्ट्र पीटीए, युनुस च-हाटकर भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड, प्रा. राऊत ज्ञानेश्वर, सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद ,शेख मुबीन, हनुमान मुळीक, जिल्हाध्यक्ष शिवबा संघटना, विजय पवार, सिद्धिविनायक इंग्लिश स्कुल संस्थापक लिंबागणेश नंदकुमार गिरे ,डाॅ.कविता गुंड आदि सहभागी होते. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना देण्यात आले.

*ऑनलाइन शिक्षण पद्धती ग्रामिण भागातील विद्यार्थी पालकांना डोकेदुखीच*
___
शासनाचा ऑनलाइन शिक्षण पद्धती अंगीकारण्याचा ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीवर सकारात्मक परीणाम दिसुन येत नसुन आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याकडे अन्ड्राईड मोबाइल नसणे अथवा रेंज नसल्यामुळेच शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळेच शासनाने ईतर ठीकाणी ५० टक्के क्षमतेचे लावलेले निकष शाळा महाविद्यालयांना देऊन परवानगी देण्यात यावी.
————–
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना सोबतच जगावं लागेल हा संदेश दिलेला असताना प्रशासनाने सरसकट शाळा बंदिचा निर्णय विद्यार्यथ्यांचे बौद्धिक, शारीरीक, मानसिक खच्चीकरण होत असून ऑनलाइन शिक्षण पद्धतीमळे शिक्षणाचा खेउळखंडोबा झाला असून आर्थिक परिस्थती तसेट मोबाइल रेंज नसणे आदि कारणामुळे शैक्षणिक नुकसान होत असून शासनाने सरसकट शाळा बंदिचा फेरविचार करून अटी व नियमांसह शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी क्लासेस यांना परवानगी देण्यात यावी.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
———–
*बीड जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना प्रदुर्भव नसल्या मुळे ग्रामीण भागातील शाळा १०० टक्के सुरू कराव्यात आणि शहरी भागातील शाळा ५० टक्के शाळा सुरू करा ज्या वेळी कोरोना प्रदूर्भव जास्त प्र माणात होईल तेव्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा. सरसकट शाळा बंद करू नयेत.
मनोज जाधव

ऑनलाइन शिक्षण पद्धती मुलांचे नुकसान:-डाॅ.कविता गुंड (मस्के)पालक
____
ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे मुलांचे नुकसान होत असून त्यांना नीट कळत नाही;रेंजची सुद्धा कमी-जास्त अडचण असते त्यामुळेच मुलांच्या भवितव्याशी शासनाने खेळु नये ऑफलाइन शिक्षण पद्धती अनुसरावी त्यासाठी शाळा महाविद्यालये सुरू करावीत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा