नातीच्या कौतुकाला आजोळ एकवटले आय.ई.एस श्रद्धा जिजाऊ सावित्रेची लेक – गणेश सावंत खेडे म्हणजे गुणवत्तेची खाण – लोकपत्रकार




नातीच्या कौतुकाला आजोळ एकवटले
आय.ई.एस श्रद्धा जिजाऊ सावित्रेची लेक – गणेश सावंत
खेडे म्हणजे गुणवत्तेची खाण – लोकपत्रकार

बीड। तालुक्यातील शहाजनपूर लोणी येथील शेतकरी असलेले नवनाथ शिंदे यांची मुलगी कु श्रद्धा ही भारतीय अभियांत्रिकी सेवेत राज्यात प्रथम देधभरातील रँक 36 ने पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरली. कु श्रद्धा हिचे आजोळ असलेल्या आंबेसावळी येथे तिच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आंबेसावळी गाव नातीचा सन्मानासाठी प्रचंड उत्साहाने एकत्र आले होते. एखादा सणोत्सव असल्याप्रमाणे संपूर्ण गाव सजले होते, दारोदार रांगोळी काढण्यात आल्या होत्या. मिरवणुकीच्या वेळी गावातील प्रत्येक कुटुंबाने स्वतःची नात असल्याप्रमाणे कु श्रद्धाचे औक्षण केले.
शेतकरी कुटुंबातून पुढे येत देशातील महत्वाच्या अशा यूपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या आय ई एस परीक्षेत श्रद्धाने मिळवलेले यश हे एकमेवाव्दितीय असे आहे. यावेळी या सन्मान सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सायं दैनिक रिपोर्टरचे संपादक गणेश सावंत सर व दै लोकाशाचे लोकपत्रकार भागवत तावरे सर, काकडे सर, कवचट सर, कानगावकर सर यांनी यावेळी श्रद्धाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यायला हवी असे मार्गदर्शन केले. यावेळी सावंत सर व लोकपत्रकार भागवत तावरे सरांनी श्रद्धासह तिला प्रेरणा देणारे तिचे वडील नवनाथ शिंदे, आजोबा व आजी ज्ञानोबा व कौशल्याबाई गुंदेकर, मामा नामदेव गुंदेकर, मोहन, अर्जुन, श्रद्धाची आई व दोन्ही लहान बंधू विशाल व वैभव यांचे विशेष कौतुक केले. आंबेसावळी हे आदर्श असे मामांचे गाव असल्याचे यावेळी गणेश सावंत यांनी सांगितले. आमची खेडे ही गुणवत्तेची खाण आहेत, श्रद्धाच्या यशाने खेड्यातही प्रचंड गुणवत्ता असते ही श्रद्धा दृढ झाल्याचे यावेळी लोकपत्रकार भागवत तावरे हे म्हणाले.
या सन्मान सोहळ्यास पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिकांसह गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामस्थ, श्री गायसमुद्रे सर, जिप शाळेचे मुख्याध्यापक श्री कानगावकर सर, श्री घुमरे सर, श्री युवराज शिंदे सर, श्री नारायण माने, लांडे पाटील, देवडकर आदींसह नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या सन्मान सोहळ्यासाठी कुंडलिक बांडे, परशुनाना बांडे, हनुमंत गुंदेकर, महेश गुंदेकर, चंद्रकांत गुंदेकर, भीमराव करांडे, चेयरमन बापूराव गुंदेकर, व्हाईस चेयरमन हनुमंत बांडे यांनी विशेष मेहनत घेतली. सन्मान सोहळ्याला यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका निभावणारे मसुराम लांडे पाटील यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. मोहन भाऊ गुंदेकर व अर्जुन काका गुंदेकर या श्रद्धाच्या मामांच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार धनंजय गुंदेकर यांनी मानले.

सार गाव मामाच व कामाच – गुंदेकर

या सन्मान सोहळ्याच्या आभार प्रदर्शन वेळी कु श्रद्धाचे मामा धनंजय गुंदेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत आंबेसावळी येत्या काळात चळवळ, अध्यात्म, वारकरी संप्रदायसह प्रशासनात नेतृत्व करणार गाव ठरेल असा विश्वास कु श्रद्धा हिचे कौतुक करताना म्हंटले. या गावचे भूमिपुत्र ज्यांनी गावाला राज्यभर ओळख दिली असे प्रसिद्ध लेखक श्रीराम गुंदेकर, युक्रांदचे निसर्गंध यांच्यानंतर हे कु श्रद्धाचे आजोळ म्हणून देखील ओळखले जाईल असे ते म्हणाले. कु श्रद्धाच्या यशापासून प्रेरणा घेत आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी पंचक्रोशीतील विद्यार्थी, युवक यशोशिखराकडे नक्की झेप घेतील असे धनंजय गुंदेकर यांनी म्हंटले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा