बीडच्या परिषदेत पंजा लढवू – खा. रजनी पाटील गांधीनगरचे युवक कॉंग्रेसमध्ये , शहरातल्या सर्व जागा लढवणार – देशमुख




बीडच्या परिषदेत पंजा लढवू – खा. रजनी पाटील
गांधीनगरचे युवक कॉंग्रेसमध्ये , शहरातल्या सर्व जागा लढवणार – देशमुख

बीड।  नगर परिषद जिल्ह्याचे ठिकाण असून शहरात कॉंग्रेसचा निर्णायक मतदार आहे , येऊ घातलेल्या नगर परिषदेत कॉंग्रेस शक्तीनिशी निवडणूक लढवणार असून नव्या पिढीच्या हातात आम्ही सत्ता आणू असा विश्वास खा रजनी पाटील यांनी व्यक्त केला . बीड शहरातील गांधी नगर , दिलावर नगर मधील युवकांनी काल कॉंग्रेस प्रवेश केला यावेळी खा . पाटील बोलत होत्या . यावेळी ओबीसी सेलचे गणेश राऊत परवेझ कुरेशी , सिराज शेख , युवकचे राहुल सोनवणे , राहुल टेकाळे आदींची उपस्थिती होती .
गांधी नगर मधील अब्बास शेख व जमीर शेख यांच्या नेतृत्वात युवकांनी काल खा रजनी पाटील यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला . गांधी विचार व धर्मनिरपेक्ष व्यवस्थेच्या संवर्धन साठी युवकांनी कॉंग्रेस ची निवड केल्याचे अब्बास व जमीर यांनी म्हटले . शहरातील नगर परिषदेच्या निवडणूक नव्या युवकांना घेऊन सत्ता मिळवणार असल्याचा विश्वास खा रजनी पाटील यांनी व्यक्त केला . प्रवेश देताना जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख आपण बीड मधील सर्व प्रभागात प्रबळ उमेदवार देणार असून पक्ष पूर्ण शक्तीने खा रजनी पाटील यांच्या नेतृत्वात गुलाल उधळेल असे म्हटले आहे . कुठल्याही परिस्थितीत पक्ष जिंकण्याची संधी दवडणार नाही कॉंग्रेस व गांधीच्या विचाराचा मोठा मतदार शहरात आहे , विकास व सलोख्यासाठी आमचा पक्ष जिंकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला . या वेळी अब्बास व जमीर यांच्या नेतृत्वात प्रदीप सुरवसे , नवनाथ खाडे , अजीम शेख , शेख समीर , शेख शफिक , शेख इरफान , आलम खान , मोसिन खान आदींनी प्रवेश केला .
…………..
रजनीताई ओबीसीच्या सुकानुधारी
केज नगर पंचायत निवडणूकी मध्ये मा खासदार रजनीताई पाटील यांनी पूर्वी
च्या ४ ओबीसी आरक्षित जागेवर कोणताही बदल न करता त्या ठिकाणी पूवीचेच ओबीसी उमेदवार कायम ठेवले आहेत त्या मुळे रजनी ताई ओबीसी बद्दल संसदेत फक्त बोलत नाहीत तर करून ही दाखवतात हे सिद्ध झाले आहे म्हणून काँग्रेस ओबीसी विभागाचे वतीने गणेश राऊत व परवेज कुरेशी यांनी विशेष आभार मानत असल्याचे म्हटले आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा