सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी – शिनगारे तर सचिव पदी दरेकर




सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी – शिनगारे तर सचिव पदी दरेकर

किल्ले धारुर । स्व. नामदेव भाऊ शिनगारे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती किल्ले धारुर ची बैठक सुदर्शन भैय्या शिनगारे व भागवत आबा लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यात सर्वानुमते अध्यक्षपदी अमरजीत शिनगारे तर सचिवपदी कुलदीप दरेकर यांची निवड करण्यात आली.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती किल्ले धारुर वर्षे 33 वे ची बैठक तुळजाभवानी मंदिर कसबा विभाग येथे संपन्न झाली गेल्या 33 वर्षापासून स्व.नामदेव भाऊ शिनगारे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेल्या शिवजयंती उत्सव 33 वर्षापासून धारूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यांच्यानंतर गेली दोन वर्ष त्यांचे चिरंजीव सुदर्शन भैय्या शिनगारे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात याच्याच नियोजनासाठी दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी तुळजाभवानी मंदिर कसबा विभाग येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यात सर्वानुमते अध्यक्षपदी अमरजीत शिनगारे,उपाध्यक्षपदी रोहित निकते, सचिवपदी कुलदीप दरेकर, सहसचिवपदी अजित शिनगारे, कोषाध्यक्ष पदी अतुल फुन्ने यांची नियुक्ती करण्यात आले. तर मिरवणूक प्रमुख नागेश भाऊ शिनगारे, मनोज जगताप, श्रीनिवास शिनगारे, प्रशांत शिनगारे, सनी शिनगारे,प्रमोद शिनगारे,हरिभाऊ मोरे,विश्वास शिनगारे,महेश साखरे,भरत शिनगारे अण्णासाहेब गोन्ने, मच्छिंद्र शिनगारे,बाळासाहेब शिनगारे,गणेश शिनगारे,जीवन पुसदेकर, दत्ता घुमरे,विजय शेळके,संकेत शिनगारे,वैभव शिनगारे,बालाजी शिनगारे, प्रदीप शिनगारे,शुभम शिनगारे,बबलू धुमाळ यांची निवड करण्यात आली.
यावेळी शिवप्रेमीसह नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा