सरकारी कामात व्यत्यय आणल्याच्या आरोपातून बळीराम जाधव यांची निर्दोष मुक्तता




सरकारी कामात व्यत्यय आणल्याच्या आरोपातून बळीराम जाधव यांची निर्दोष मुक्तता

बीड l प्धी: घटनेची थोडक्यात हकीकत अशी की , फिर्यादी बाबासाहेब किशनराव वाघमारे हा माजलगाव आगार येथे बस वाहक म्हणून कार्यरत होता . दि . १८-११-२०१८ रोजी फिर्यादी व वाहक आबासाहेब सुखदेव राठोड हे त्यांच्या ताब्यातील बस क्र . एम . एच . १४ बी . टी . – ०१२ ९ ही त्यामध्ये प्रवासी घेऊन माजलगाव आगारातून ५.३० वाजता निघून आष्टी तालुका परतूरपर्यंत गेले व तेथे पूर्ण प्रवासी सोडून तेथून प्रवासी घेऊन परत माजलगावकडे येत असताना समारे ८ च्या दरम्यान भाटवडगाव येथील अरुंद पुलावर आले असता , माजलगावकडून एक मोटार सायकल स्वार एक पॅशन प्रो कंपनीची जिचा रजि.क्र . एम . एच.४४-११३६ असा होता . सदर मोटार सायकलस्वाराने सदर मोटार सायकल बसचे समोर लावली . त्यामुळे फिर्यादी त्यास म्हणाला की , पुल अरुंद आहे , बस जात नाही , त्यावेळी आरोपी बळीराम याने फिर्यादीस धक्काबुक्की केली व बस जाऊ देत नाही , असे म्हणून धमक्या दिल्या व बस १० ते १५ मीनीटे थांवली . सदर फिर्यादीच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला , त्याचा गु.र.नं .३८६ / २०१८ असा होता . सदर गुन्ह्याचा तपास श्री . सोमनाथ द्रोणाचार्य नरके यांनी करून सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा . न्यायालयात दाखल केले . सदर प्रकरणात सरकार तर्फे बस चालक , बस वाहक व तपासी अधिकारी यांची साक्ष नोंदवण्यात आली व आरोपीने घटनास्थळ व फिर्यादीचे मेडीको लिगल सर्टिफिकेट मान्य केले . सदर प्रकरणातील साक्ष पुरावे व आरोपी बळीराम जाधव तर्फे घेतलेला बचाव गृहीत धरून व आरोपीचे विधीज्ञ अॅड . सागर नाईकवाडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून सबळ पुराव्याअभावी आरोपीस मा.जिल्हा व न्यायाधीश -२ , माजलगाव श्री . देशमुख यांनी निर्दोष मुक्त केले . सदर केसमध्ये आरोपीतर्फे अॅड . सागर नाईकवाडे यांनी काम पाहिले . त्यांना अॅड . सतिषजी गाडे , अॅड . सुधीरजी जाधव , अॅड . राजेशजी जाधव , अॅड . एल . बी . गवते यांनी सहकार्य केले .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा