कोरोना नियमांचे पालन करत राज्यातील शैक्षणिक संस्था त्वरित सुरू करा – एसएफआय




 

जिल्हा प्रशासनामार्फत एसएफआयचे राज्य सरकारला निवेदन ।

बीड।  राज्यातील ग्रामीण आणि कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात नसलेल्या भागात नियमांचे पालन करत शैक्षणिक संस्था त्वरित सुरू करण्याची मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ने केली आहे. बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना एसएफआयने यासंदर्भात निवेदन पाठवले आहे.

निवेदनात एसएफआयने म्हटले आहे की, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. महामारी आज थांबेल, उद्या थांबेल असे करत तब्बल दोन वर्षे उलटून गेली. परंतु महामारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. कोरोनाच्या नावाखाली दोन-दोन वर्षे शैक्षणिक संस्था बंद ठेवणे उचित नाही. या काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान कोणत्याही परिस्थितीत पुन्हा भरून काढणे शक्य नाही. परंतू या पुढचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करत शासनाने त्वरित शैक्षणिक संस्था सुरू कराव्यात. अशी मागणी एसएफआयने केली आहे.

एकीकडे राज्यातील इतर क्षेत्र सुरू आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार, प्रवास, बैठका, निवडणुका हे सर्व सुरू आहे. परंतू शैक्षणिक संस्था मात्र बंद ठेवण्यात आल्या. एक वेळेस इतर क्षेत्रातील झालेले किंवा होत असलेले नुकसान येत्या काळात भरून काढता येणे शक्य आहे. पण विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढणे शक्य आहे का? हा विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजासमोरील मोठा प्रश्न आहे. कोरोनाच्या नावाखाली शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळणे थांबवावे. अशी ठाम भूमिका एसएफआयने घेतली आहे.

म्हणून कोरोना नियमांचे पालन करत राज्यातील ग्रामीण व महामारीचा अधिक संसर्ग नसलेल्या भागातील शैक्षणिक संस्था त्वरित सुरू करा. या मागणीसाठी एसएफआय तर्फे आज दिनांक २० जानेवारी रोजी महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या भागातून एसएफआयने राज्य सरकारला निवेदन पाठवले.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, जिल्हा कमिटी सदस्य शिवा चव्हाण, बीड तालुका कमिटी सदस्य आकाश जाधव यांच्यासह अशोक जोगदंड, अभिषेक लाखे, स्वप्नील डोईफोडे, युवराज चव्हाण, परमेश्वर राठोड, निखिल चव्हाण, सोमनाथ सरवदे, प्रशांत चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

===============================
वडवणी शहरांमध्ये तहसीलदार प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या मार्फत ही पाठवले मुख्यमंत्र्यांना निवेदन.

वडवणी । शहरांमध्ये संघटनेच्यावतीने वडवणी तहसीलदार यांच्यामार्फत तसेच शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्य मुख्याध्यापक यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले यावेळी जिल्हा सचिव लहू खारगे, ज्योतीराम कलेढोण, दिगंबर गुरसाळी, गोपाळ लोकरे, माऊली टकले व विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा