बंद असलेल्या राज्यभरातील शाळा सोमवारी २४ जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार!




 

सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होणार

शाळा सुरू करण्यासाठी डॉ.गणेश ढवळे आणि मनोज जाधव यांनी उभा केले होते आंदोलन


राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते बारावी असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसंच निर्णयाचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असतील असंही स्पष्ट केलं आहे. पालकांची समंती आवश्यक असून त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. बालवाडी ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे. मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे स्थानिक स्थितीकडे लक्ष ठेवत वारंवार आढावा घेतला जावा आणि त्यानुसारच निर्णय घेतला जावा, असं यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. स्थानिक प्रशासनाने निर्णय घेताना तिथल्या परिस्थितीचा अंदाज घ्या असं सांगताना एक निर्णय घेतो म्हणून दुसऱ्याने घेतलाच पाहिजे असं नाही हे स्पष्ट केलं. त्याच बरोबर शाळा , महविद्यालये सुरू व्हावीत या साठी बीड मध्ये विविध संघटना ,सामजिक कार्यकर्ते यांनी निवेदन दिली होती. यात सामजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशासन आणि सरकार ला जागे करण्यासाठी घंटा नाद करत “स्कूल चले हम” आंदोलन उभा केले होते. आज त्यांचे आंदोलन फळाला आहे.

स्थानिक पातळीवर ज्या ठिकाणी कोरोना संकट नियंत्रणात असेल तिथे शाळा सुरू करण्याचे आदेश

प्रत्येक भागातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.” एका महापालिलेने , जिल्हा परिषदेने किंवा शाळेने निर्णय घेतला म्हणजे सर्वांनी तो फॉलो करावा असं नाही. अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा. शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने याआधीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना पुन्हा शाळा सुरू करताना कायम असतील.

स्थानिक पातळीवर कोरोना संकटाचा आढावा घेतल्यानंतर प्रशासनाने परवानगी दिली तर संबंधित भागातील शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू होतील. कोरोना नियमांचे पालन करुन शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू केले जातील. मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी आहे. यामुळे शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू ठेवा अशी मागणी आम्ही केली होती .अखेर राज्य शासनाने कोरोना नियंत्रणात असलेल्या भागांमध्ये सोमवारपासून शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू करत असल्याचे जाहीर केले. त्याचे आम्ही स्वागत करतो
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर

एखाद्या भागातील मंदिर किंवा ज्यांच्या घरात पुरेसी जागा आहे तेथे 25-30 विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे. मुलं घरीच बसली तर शाळेबद्दल नकारात्मकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. कोरोना कधी जाईल हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे त्याला जुळवून घेऊन काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. शिक्षणातलं होणारं नुकसान मोठं आहे. कोरोनाचा सर्वांत वाईट परिणाम शिक्षणावर झाला आहे. पाच दहा वर्षानंतर याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरुवात होईल, तेव्हा आता शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
मनोज जाधव

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा