अ.भा. मराठी पत्रकार परिषदेने च्या अवाहणास र कर्करोगाशी झुंज देणाऱ्या पत्रकार योगेश कोरडे यांच्या खात्यात एक लाख रुपये पेक्षा जास्त निधी जमा चला आपण हि पुढाकार घ्या मदत करा -अवाहण




अ.भा. मराठी पत्रकार परिषदेने च्या अवाहणास राज्यातून उस्फूर्त प्रतीसाद कर्करोगाशी झुंज देणाऱ्या पत्रकार योगेश कोरडे यांच्या खात्यात एक लाख रुपये पेक्षा जास्त निधी जमा चला आपण हि पुढाकार घ्या मदत करा — अवाहण

मुंबई ।अखिल भारतीय मराठी पञकार परीषदेने मुख्यविश्वस्त एस एम देशमूख यांचे मर्गदर्शना नुसार नेहमीच कठीण वेळा पञकाराचे मदतिला सरसवली आहे. नागपूर येथील युवक पञकार योगेश कोरडे हे सध्या कर्करोगाशी झुंजत आहे उपचरा साठी त्यांना आर्थीक मदतीची आवश्यता आहे पञकाराचे नेते एस एम देशमूख यांनी अवाहण करताच राज्यभरातून अनेक हात सरसावले आहेत 111700/- रुपये मदत थेट योगेश कोरडे यांच्या खात्या वर जमा झाली असून उपचाराचा खर्च जास्त असल्याने आपण हि आर्थीक मदत थेट करून सहकार्य करावे व सर्वांना चांगला संदेश द्यावा असे अवाहण मराठी पञकार परीषदेचे राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन यांनी केले आहे.

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात राहणारे ‘नाही रे’ वाल्या वर्गाच्या बाजूने लेखन करणारे संघर्षशील सच्छिल पत्रकार अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे खंदे समर्थक उपाध्यक्ष योगेश नानाजी कोरडे यांची गेल्या सहा महिन्यापासून कर्करोगाशी झुंज चालू आहे. त्यांना डिफ्युज लार्ज बी सेल लिंफोमा (डी.एल.बी.सी.एल) हा कर्करोग झाला आहे. आधी त्यांच्यावर नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या कॅन्सर रुग्णालयात उपचार सुरु होते. आता त्यांच्यावर जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट मध्ये उपचार सुरु आहेत. उपचाराचा असलेला खर्च अधिक असल्यामुळे त्यांनी डिसचार्ज करून घेतला. त्यांच्याकडे अधिस्विकृती पत्र नसल्यामुळे शासकीय योजनेपासूनही ते वंचित राहिले आहे. योगेश यांना तिसऱ्या स्टेज दरम्यान कर्करोगाचे निदान झाले होते. नुकतेच तपासणी दरम्यान कर्करोग चौथ्या स्टेजवर असल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यांच्या उपचाराचा अपेक्षित खर्च पाच लाखापर्यंत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांच्यासोबत पत्नी आणि दोन लहान मुली आहेत.अ.भा. मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांचे हित जपणारी राज्यातील सर्वाधिक सदस्य असलेली संघटना आहे. या संघटनेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख म्हणतात, ‘‘आपण एक टीम नाही, कारण आपण एकत्र काम करतो, खरं तर आपण एकमेकांचा आदर’ करतो, एकमेकांवर विश्वास ठेवतो व एकमेकांची काळजी घेतो आम्ही (एक) आहोत. ‘मराठी पत्रकार परिषद’ याच विचाराने ध्येयाने संकटात सापडलेल्या राज्यातील अनेक पत्रकारांना परिषदेने मदत केल्याची उदाहरणे आहेत. तद्‌वतच योगेश कोरडेंच्या उपचारासाठी मराठी पत्रकार परिषद धावली आणि राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु झाला. प्रारंभी एसेम देशमुख यांनी ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे व्यक्तीगत मदतीसह परिषदेच्या मदतीने प्रारंभ केला. आणि संपूर्ण परिषद कामाला लागली आणि आज समाजासाठी लाखमोलाचा असलेल्या माणसाचा जीव वाचविण्यासाठी योगेश यांच्या खात्यात मदतीचा लाखाचा आकडा ओलांडला गेला 111700/- रुपये मदत उपचारा साठी जमा झाली आहे उस्फूर्त प्रतीसाद राज्यभरातून मिळत आहे. खर्च जास्त असल्याने आर्थीक मदतीची आवश्यकता,आहे आपण हि पुढाकार घ्या व
अल्पशी कमीत कमी शंभर रुपयाची अथवा थोडी अधिक मदत योगेश कोरडे यांच्या खात्यात अथवा ‘फोन पे’ ने सोबतच्या त्यांच्या नंबरवर परस्पर जमा करावी व माझ्या नंबरवर त्याची पोच पाठवावी ही नम्र विनंती. आपली आर्थीक मदत नक्कीच कर्करोगाशी झुंज देणाऱ्या एका तरुण पत्रकार मित्राला मृत्युच्या दारापासून परत फिरविणारी व योगेशच्या पंखांना पुन्हा उंच भरारी घेण्यासाठी बळ देणारी ठरेल. त्यामुळे आपण हि आर्थीक मदत करावी असे अवाहण मराठी पञकार परीषदेचे राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन यांनी केले आहे.

 

Yogesh Nanaji Kordre, Union bank Kalmeshwar

A.c.no.669202010003317

UBIN0566926

Phone pay Mob. 9767000200

यांचे हे बँक अंकाऊट नंबर व फोन पे नंबर आहे तरी यावर थेट मदत पाठवून, सहकार्य करावे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा