मूकनायक व माजलगाव भुषण पुरस्काराचे थाटात वितरण




मूकनायक व माजलगाव भुषण पुरस्काराचे थाटात वितरण

चांगल्या कामाची लोक दखल घेतात :आ.निलेश लंके

पत्रकारिता समाजाला दिशा देण्याचं काम करते : आ.प्रकाश सोंळके

माजलगाव ( प्रतिनिधी ) चांगल्या कामातून त्या व्यक्तीची ओळख निर्माण होते,मि सुध्दा जेव्हा जेव्हा ग्रामपंचायत ताब्यात आणली तेव्हापासून मि लोकांची कामे आहोरात्र करत गोलो,मि आमदार पद किंवा सरपंच पद या पलीकडे जाऊन लोकांची कामे करत होतो आणी करत आहे. कोवीड काळतील माहाभयानक काळामध्ये मि लोकांना धिर देण्याचे काम त्याचबरोबर त्यांच्यासोबत खंबीरपणे सोबत राहुन त्यांची काळजी घेण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन पारनेर-नगर विधानसभेचे आ.निलेश लंके यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आयोजित मुकनायक व माजलगाव भुषण पुरस्कार वितरण प्रसंगी केले.

माजलगाव सुरक्षा समितीच्या वतीने येथील वैष्णवी मंगलकार्यायलात दि २१ जाने शुक्रवार रोजी दुपारी ३:०० वाजता मुकनायक दिनानिमित्त मुकनायक व माजलगाव भुषण पुरस्काराचे आयोजन केले होते,या व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून पारनेर-नगर विधानसभेचे आ.निलेश लंके यांची उपस्थिती होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजीमंत्री तथा आ.प्रकाश सोळंके हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बहुजण विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे,भाजपा नेते रमेश आडसकर,छत्रपती कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहनराव जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजासाहेब देशमुख, पारनेर पंचायत समितीचे सभापती सुदाम पवार,प्रख्यात साहीत्यीक तथा लेखक दिग्दर्शक डाँ. आनिलकुमार साळवे, विरेंद्र भौय्या सोळंके,सभापती भागवत खुळे यांची उपस्थिती होती, कार्यक्रामाच्या सुरुवातीला तिन्ही संरक्षण दालाचे प्रमुख स्व.बिपिन रावत,स्व.सिंधुताई सपकाळ जेष्ठ विचारवंत भाई.डॉ.एन.डी पाटील यांना दोन स्तब्ध उभा राहुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,यावेळी आ.निलेश लंके व आ.प्रकाश सोळंके यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुकनायक व माजलगाव भुषण पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले, यावेळी बोलताना आ.निलेश लंके असे म्हणाले की,मुकनायक व माजलगाव भुषण पुरस्कार प्राप्त सर्वांचे आभिनंदन करत चांगल्या कामातून त्या व्यक्तीची ओळख निर्माण होते,मि सुध्दा जेव्हा जेव्हा ग्रामपंचायत ताब्यात आणली तेव्हापासून मि लोकांची कामे आहोरात्र कामे करत गोलो,मि आमदार पद किंवा सरपंच पद या पलीकडे जाऊन लोकांची कामे करत होतो आणी करत आहे.कोवीड काळतील माहाभयानक काळामध्ये मि लोकांना धिर देण्याचे काम केले, त्याच बरोबर त्यांच्यासोबत खंबीरपणे सोबत राहुन त्यांची काळजी घेण्याचे काम केले आहे.असे प्रतिपादन पारनेर-नगर विधानसभेचे आ.निलेश लंके यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आयोजित मुकनायक व माजलगाव भुषण पुरस्कार वितरण प्रसंगी केले.अध्यक्षीय समरोपा प्रसिद्ध आ.प्रकाश सोळंके म्हणाले की,मुकनायकाच्या माध्यमातून डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाल दिशा देण्याचे काम केले असुन पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे, आणी आजच्या पत्रकारांनी सत्य परिस्थिती समाजासमोर बातमीच्या माध्यमातून आणली पाहीजे,खऱ्या अर्थाने पत्रकारांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे असे आ.प्रकाश सोळंके यांनी अध्यक्षीय.समारोपा प्रसंगी व्यक्त केले.यावेळी,बाबुराव पोटभरे, रमेश आडसकर, राजासाहेब देशमुख,मोहन जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रस्तावित पत्रकार पांडुरंग उगले यांनी केले,तर सुत्रसंचालन आशोक वाडेकर सर यांनी,आभार प्रदर्शन पत्रकार सुरक्षा समितीचे उपध्याक्ष ज्योतिराम पाढंरपोटे यांनी केले, कार्यक्रमाची सांगता राष्ट गिताने करण्यात आली, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आडागळे, सचिव आमर.साळवे,जेष्ठ पत्रकार प्रदिप कुलकर्णी, संघटक ज्ञानेश्वर कापसे व पत्रकार राजाभाऊ पाष्टे यांनी घेतले.

 

यांचा झाला गौरव

पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मुकनायक दिनानिमित्त मुकनायक पुरस्काराने दै बीड पुण्यभुमीचे कार्यकारी संपादक जितेंद्र सिरसाट,माजलगाव तालुक्याचे भुमीपुत्र तथा दै आदर्श गावकरीचे मुख्य उपसंपादक अशोक खाडे यांना गौरविण्यात आले तर माजलगाव भुषण पुरस्काराने भाई गंगाभिषण थावरे,डाँ.वसिम मनसबदार, आविनाश गोंडे,राहुल फुलगे,शिवहारी यादव व रुपचंद आभारे यांना गौरविण्यात आले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा