बीडच्या खासदार गेवराई मतदार संघासाठी नाहीत का ? 




इतर मार्गाला राष्ट्रीय दर्जा देणाऱ्या खासदार व आमदारांना शहापूर-गेवराई मार्गाचा वीसर पडला :  संग्राम आहेर
गेवराई / प्रतिनिधी ।
    बीड जिल्ह्यासाठी नवीन चार राष्ट्रीय महामार्ग केले यासाठी ७६८ कोटी रुपयांचा निधी केंद्रांने दिल्याचा उल्लेख करीत बातम्या काल शनिवार रोजी विविध वर्तमान पत्रातून प्रसिद्धीस झाल्या मात्र नगर, बीड, नांदेड सह परभणी जिल्ह्यातील नागरीकांना महत्वाचा शहापूर – कळसूबाई – अकोले – संगमनेर -श्रीरामपूर- नेवासा – शेवगाव- उमापूर- गेवराई या राज्य मार्ग क्रमांक ४४ पुर्णपणे खड्ड्यांनी व्यापला असून ही बीड व नगरच्या लोकप्रतिनिधींकडून कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही त्यामुळे या मार्गाच्या विकासासाठी बीडच्या खासदार व गेवराईच्या आमदारांना विसर पडला की काय ? असा उपरोधीक सवाल माजी जि. प. सदस्य संग्राम आहेर यांनी केला आहे, तसेच केंद्रातून आलेला निधी फक्त परळी व बीड मतदार संघालाच येतो, तो गेवराई मतदार संघाला का नाही ?  बीडच्या खासदारांना गेवराईला निधी चालत नाही का ? असाही प्रश्न संग्राम आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला आहे.
     गेवराई मतदार संघ हा गत दहा पंधरा वर्षापूर्वी जालना लोकसभा मतदार संघात जोडलेला होता त्यावेळेस सद्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांना या मतदार संघाने मताधिक्य देवुन ही मतदार संघासाठी कोणतेच विकास कामे झाली नव्हती, पंधरा वर्षापासून गेवराई बीड लोकसभा मतदार संघात जोडले गेल्यानंतरही या मतदार संघाची कायम उपेक्षाच आहे. बीडच्या खासदारांनी मतदार संघात रस्ता किंवा इतर विकास कामासाठी डावलले आहे. केंद्रात सरकार व खासदार, आमदार भाजपाचे असूनही केंद्राचा निधी मिळत नाही ही लोकप्रतिनिधींचा विकास कामाच्या बाबतीत अभाव असल्याचे दिसून येते. अहमदनगर व बीड जिल्ह्याला जोडणारा महत्वाचा मार्ग शहापूर – नेवासा – शेवगाव- उमापूर- गेवराई या मार्गाला खड्डेच खड्डे झाले आहे अनेक छोटे-मोठे अपघात होवुन प्रवाशी जखमी होत आहेत. कारखान्याला जाणाऱ्या उसाचे ट्रक्टर पलटी होवुन शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान होत आहे. अनेकांना पाठीच्या मनक्याचा त्रास होत आहे, अनेकवेळा पाठपूरावा करून ही या मार्गाकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. गेवराईच्या आमदारांनी २०१८ साली या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याचे जाहीर करून उमापूरकरांचा जाहिर सत्काराचा स्विकार केला होता. २०१८ सह २०२१ साल संपले तरीही रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला तर नाही. मात्र राज्य मार्गाच्या दुरुस्ती साठीही लोकप्रतिनिधींकडून कोणतेहा प्रयत्न होताना दिसत नसल्याचा उल्लेख ही प्रसिद्धी पत्रकात माजी जि. प. सदस्य संग्राम आहेर यांनी केला आहे.
 भाजपाला भरभरुन मते देणाऱ्या मतदार संघात खासदारांकडून विकासाकडे कानाडोळा ।
     जालना लोकसभेला गेवराई मतदार संघ जोडलेला होता तेव्हापासून या मतदार संघातील मतदारांनी भाजपालाच भरभरून साथ दिलेली असतानाही या मतदार संघाकडे निवडून आलेल्या खासदारांनी मात्र निधीच्या बाबतीत कानाडोळा केल्याचेच दिसून येते बीड लोकसभा मतदारसंघात जोडल्यानंतर तर काही फायदा होईल या आशेने खासदार प्रीतम मुंडे यांना दोन्ही वेळेस मताधिक्य देऊनही विकास निधीचा पत्ताच नसल्याने पूढे या भागातून मताधिक्य राहण्याची शक्यता कमीच आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा