अजय धुमाळ सह पाच जणांवर कार नावावर करूण देतो म्हणुन फसवणूकीचा गुन्हा दाखल




माजलगाव :(प्रतिनिधी) कार नावाची करुण देतो म्हणुन ४ लाख रुपये घेवुन फसवणुक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरुन अजय लिंबाजी धुमाळ,विजय लिंबाजी धुमाळ,लिंबाजी धुमाळ,शेख कलिम बाशा व तेजस रविंद्र आल्हाट या पाच जणाविरुध्दात माजलगाव शहर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला.
      राहुल नंदकुमार देशमुख (३१) राहणार शिवाजी महाराज नगर माजलगाव यांनी या प्रकरणी तक्रार देत चार चाकी वाहन नावचे करुण देतो म्हणुन सुरुवातीस सहा लाख रुपयात व्यवहार ठरला नतंर त्या व्यवहारापोटी ४ लाख रुपय पैकी काही नगद स्वरुपात व काही आँनलाईन पध्दतीने दिले. रक्कम पोहच झाल्यानतंरही सदर गाडी नावावर करण्यास टाळाटाळ केली व चारचाकी वाहन नावचे केले नाही सदर फिर्यादीने वेळोवेळी वरील नमुद व्यक्तिना वेळोवेळी संपर्क केला असता त्यापैकी अजय धुमाळ व शेख कलिम यांचा संंपर्क होवु शकला नाही परंतु या व्यवहारात सहभागी असलेले लिंबाजी धुमाळ व विजय धुमाळ यांच्याशी संपर्क करुण रक्कम परत द्या अशी विनंती केली असता सदरील दोघांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. फिर्यादिने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच न्यायालयात धाव घेतली असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे फिर्याद दाखल केली होती यावर सुनावणी होउन मा.न्या.एस.एम.जाधव यांनी आरोपी अजय लिंबाजी धुमाळ,विजय लिंबाजी धुमाळ,लिबांजी धुमाळ,शेख कलीम बाशा व तेजस रविंद्र आल्हाट यांच्यावर कलम भा.द.वि.४२०,४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान राहुल देशमुख यांच्या वतिने अँड.दिपक देशमुख यांनी काम पाहिले व त्यांना अँड.प्रसाद कुलकर्णी यांनी सहकार्य केले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा