सुस्त प्रशासनाच्या नाकर्तेपणा मुळेच आत्मदहन – रंजीत जाधव




सुस्त प्रशासनाच्या नाकर्तेपणा मुळेच आत्मदहन – रंजीत जाधव
माजलगाव ( प्रतिनिधी ) शेत रस्ता खुला व्हावा यासाठी गेल्या चार वर्षापासून तहसील कार्यालय माजलगाव येथे शेकडो चकरा मारून न्याय मिळत नसल्याने, कुटुंबावर जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली असल्याने कुटुंबासाठी तहसीलदार यांना वारंवार विनंती करून देखील त्यांनी कोणतीही गांभीर्यपूर्वक कार्यवाही न केल्यामुळे २६ जानेवारी २०२२ रोजी आत्मदहन करण्याबाबत तहसील प्रशासनाला पंधरा दिवसापूर्वी निवेदन देऊन देखील आद्याप कुठलीही कारवाई केली गेली नाही म्हणून सुस्त प्रशासनाच्या नाकर्तेपणा ला कंटाळून आत्मदहन करत असल्याचे रंजीत जाधव यांनी म्हटले आहे.
कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी रस्ता तहसील प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे, निष्काळजीपणामुळे मिळत नाही.
यामुळेच माझ्या कुटुंबाची असणारी जमीन उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असताना देखील पडित  ठेवावी लागत आहे, त्यामुळे माझ्या व माझ्यावर व कुटुंबियांच्यावर उपासमारीची वेळ येत असून न्याय मिळत नसल्यामुळे रस्त्यासाठी २६ जानेवारी २०२२ रोजी झेंडावंदनानंतर तहसील कार्यालय माजलगाव येथे आत्मदहन करणार असून या आत्मदहनाला तहसिल प्रशासन जिम्मेदार आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा