पुरोगामी पत्रकार संघ केजचे पुरस्कार विवीध क्षेत्रातील मान्यवरांना जाहीर




पुरोगामी पत्रकार संघ केजचे पुरस्कार विवीध क्षेत्रातील मान्यवरांना जाहीर.

केज ।अखिल भारतीय पुरोगामी पत्रकार संघ केज शाखेचे मूकनायक दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने केज येथे २०२१- २०२२ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.महाराष्ट्र शासनाबरोबरच केंद्र सरकारची मान्यता असणारा राज्यासह देश पातळीवर पत्रकारांसाठी त्यांच्या न्याय व हक्कांसाठी झगडणारा राष्ट्रीय पत्रकार संघ म्हणून या संघाची ओळख आहे. तालुक्यात अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण करणारा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी,आवाज उठवणार प्रयत्नशील पत्रकार संघ अशी केज शाखेची ओळख आहे.


या संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पत्रकारिता,प्रशासकीय,सामाजिक,आरोग्य ,शैक्षणीक,क्रीडा, पर्यावरण आणि साहित्य या क्षेत्रात यशस्वीपणे आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरोगामी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असुन यात पञकार जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री.मधुकर दादा सिरसाट प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे दबंग पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.पंकज कुमावत साहेब ,सामाजिक क्षेत्रातील सामाजिक पुरस्कार डॉ.गणेश ढवळे लिंबगनेशकर व श्रीमती.अनिता कांबळे, उत्कृष्ट निर्भिड संपादक पुरस्कार जालिंदर धांडे,शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार श्री.वसंत तरकसबंद, आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट आरोग्य अधिकारी पुरस्कार श्रीम.डॉ.अरुणा केंद्रे ,उत्कृष्ट महिला समुपदेशक पुरस्कार श्रीम.जनाबाई खाडे ,पर्यावरण विषयक पुरस्कार श्री. डॉ.हनुमंत सौदागर, उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार कूमारी. प्रियंका इंगळे आणि युवा सहित्यक पुरस्कार कवी किशोर भालेराव आदी मान्यवरांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.पुरस्कार प्राप्त मान्यवरांना मूकनायक दिनानिमित्त साजरा होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.विजय सुर्यवंशी व विविध मान्यवरांच्या विशेष उपस्थिती प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पुरोगामी पत्रकार संघाच्या पदाधिकऱ्यांनी दिली आहे.
पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे विविध स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा