भागवत तावरे यांना लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवन गौरव पुरस्कार आ निलेश लंके व आ मोनिका राजळे हस्ते होणार सन्मान !




भागवत तावरे यांना लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवन गौरव पुरस्कार
आ निलेश लंके व आ मोनिका राजळे हस्ते होणार सन्मान
पाथर्डी ।


भगवान गड परिसर प्रेस क्लब संघाच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवन गौरव पुरस्कार आणि कोरोणा योद्धा सन्मान पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भगवान गड परिसर प्रेस क्लबचे जनरल सेक्रेटरी प्रा दादासाहेब खेडकर यांनी दिली आहे बीड येथील पत्रकार भागवत तावरे यांना लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवन गौरव पुरस्कार भव्य समारोहात दिला जाणार आहे . भागवत तावरे यांच्या परखड लिखाण व सामाजिक उपक्रमातील सहभागाचा हा सन्मान असल्याचे संयोजकाकडून जाहीर करण्यात आले .
याबाबत अधिक माहिती अशी की लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यातील संघर्षमय सामाजिक जीवनात प्रेरणा मिळावी या हेतूने राजकीय सहकार शैक्षणिक क्रीडा संस्कृती पत्रकारिता क्षेत्राशी निगडित समाजातील वैश्विक काम करणाऱ्या व्यक्तींचा जीवन गौरव पुरस्कार आणि सन्मान करण्यात येणार आहे तसेच कोरोणा काळात कोवीड योद्धा म्हणून ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करत अनेक रुग्णांना वैद्यकीय सेवा देत सामाजिक बांधिलकी जपत कोवीड काळात कोवीड सेंटर चालवणाऱ्या तसेच कोवीड मध्ये विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रुग्णांना मदत करून यांचे जीवनमान मनोबल उंचावणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या कार्यक्रमात केला जाणार आहे या कार्यक्रमासाठी नगर पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके पाथर्डी शेवगाव मतदारसंघाचे आमदार मोनिका राजळे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे पंचायत समिती सभापती सुनीता दौंड तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत भगवानगड परिसर प्रेस क्लबचे अध्यक्ष कृष्णनाथ अंदुरे जनरल सेक्रेटरी प्रा दादासाहेब खेडकर उपाध्यक्ष सतीश जगताप कार्याध्यक्ष महादेव बटुळे प्रसिद्धीप्रमुख अशोक आव्हाड संपर्कप्रमुख नितीन अंदुरे ज्येष्ठ पत्रकार व सल्लागार रमेश जोशी कार्यकारणी सदस्य विजय शिवगजे अमोल होरणे शैलेंद्र जायभाये राजू शिंदे कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत . भगवानगड परिसर प्रेस क्लब च्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवन गौरव पुरस्कार व कोरोणा योद्धा सन्मान पुरस्कार सोहळा दि २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भाऊ बाबा मंगल कार्यालय ढाकणवाडी फाटा येथे होणार असून या कार्यक्रमासाठी अहमदनगर बीड जिल्ह्यातील व पाथर्डी तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे – कृष्णनाथ अंदुरे – अध्यक्ष- भगवानगड परिसर प्रेस क्लब .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा