लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे वाहनाला अपघात तीन जण गंभीर जखमी




लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे वाहनाला अपघात तीन जण गंभीर जखमी
नेकनूर । येळंब घाट येथून धारूर कडे लग्नाचे वरात घेऊन निघालेला छोटा हत्ती चालकाचा ताबा सुटल्याने नांदुरफाटा जवळ पलटी झाला. यामधील पाच जण जखमी असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. तरी घटना रविवार ता. २२ रोजी सकाळी दहाच्या दरम्यान घडली . येळंबघाट येथील लग्न सोहळ्याचे वऱ्हाड घेऊन धारूर कडे चाललेला छोटा हत्ती क्रं. एम. एच.१४. डी एम . २९५९. हा रविवारी सकाळी वाजता छोटा हत्ती नांदुरफाटा जवळ चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला यामध्ये. लैला अख्तर शेख वय ४० ,सय्यद नुरा वय ४५ ,शेख तय्यब वय २६ ,पठाण रशिदा वय ७० ,वहिदा इस्माईल शेख वय ४०सर्व राहणार येळबघाट ता. बीड हे जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी स. पो. नि
शेख मुस्तफा, पो. उप. नि. विलास जाधव पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांनी धाव घेतली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा