जिल्ह्यामध्ये सहा कारखाने सुरू असतानाही शेतकऱ्यांच्या माथी वनवास 




“कारखानदारांकडून बगलबच्च्यांना न्याय”

“मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय”

“माजलगाव मतदार संघात आणखी एक कारखाना होणे अपेक्षित”

बीड l
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात माजलगावच्या धरणामुळे वडवणी तालुक्यात डोंगरपट्टयाच्या कुशीमध्ये वसलेल्या अप्पर कुंडलिका प्रकल्पामुळे खूप मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढलेले असून त्यामुळे डोंगराच्या माथ्याशी व जिथे कुसळे उगवत नव्हते तिथे मात्र आता ऊस पिकू लागला आहे त्यामुळे उसाचे क्षेत्र वडवणी तालुक्यासह डोंगरपट्ट्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला असून आज परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये एकंदरीत पाहिले तर पाच कारखाने सध्या सुरू आहेत त्यामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखाना, जय महेश शुगर, सुंदरराव सोळंके साखर कारखाना, येडेश्वरी कारखाना, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, आंबा साखर कारखाना,हे कारखाने सध्या गाळप करत आहेत परंतु आणि गेटनच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक होताना दिसत आहे त्याचबरोबर सध्या परिस्थिती पाहिली तर हे सर्वच कारखाने स्वतःचे राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी व उसाचे राजकारण करताना दिसत आहेत त्यामुळे सर्वसामान्य अतिशय मेटाकुटीला आलेला असून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे वशिलेबाजी करून प्रत्येक राजकीय पुढारी आपल्या पक्षाचा कार्यकर्ता त्याच बरोबर जे लोक राजकीय पुढाऱ्यांच्या मागेपुढे फिरतात त्यांचा गोडवा गातात त्यांच्या ऊसाला मात्र तात्काळ कारखानदारकडून ऊस तोडण्यासाठी टोळी दिली जाते परंतु जे सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांना मात्र अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी व आपल्या कारखानदारांनी सर्व गोष्टीचा विचार करून सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय द्यावा अशा आशयाचे प्रसिद्धीपत्रक शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे
पुढे ते म्हणाले की आज परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्याचं अतिशय जोपासलेला आणि तेच मोठे उत्पन्न या उद्देशाने शेतकरी हा उसाचे पीक घेत असतो परंतु त्या उसाच्या पिकांमुळे मात्र शेतकरी अतिशय त्रस्त झाला असून व त्यांना कोणी वाली राहिला आहे की नाही असे आता एकंदरीत बोलले जात असून सर्वसामान्य शेतकरी मात्र ऊस जाईल की नाही या भूमिकेत आहे आणि उसाचे क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून कारखाने मात्र उसाचे राजकारण करण्यात दंग आहेत त्यामुळे बळीराजा आता अडचणीच्या काळातून जाताना दिसत आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील पाचही कारखानदारांनी सर्व गोष्टीचा विचार करून व उसाचे राजकारण न करता शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या शेतामध्ये उभा असलेला ऊस घेऊन जाऊन त्यांना कारखानदार न्याय देतील काय.?असा उपस्थित शेतकऱ्याच्या माध्यमातून होताना दिसत आहे त्यामुळे सर्वच बीड जिल्ह्यातील सहाही कारखानदारांनी राजकारण न करता शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस घेऊन जाणे अपेक्षित आहे मात्र असे होताना दिसत नाही शेतकरी हा राबराब राबून काबाडकष्ट करून शेतामध्ये खूप मेहनतीने उसाचे पीक जोमात आणतो आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी आर्थिक परिस्थिती सुधारेल या उद्देशाने तो उसाचे पीक घेत असतो परंतु परिस्थिती पाहता शेतकऱ्यावर खूप मोठे संकट आता येताना दिसत आहे शेतातील उभा असलेला ऊस जाईल की नाही या चिंतेमध्ये मात्र आता शेतकरी चिंताग्रस्त होताना दिसत आहे त्यामुळे तात्काळ बीड जिल्ह्यातील पाचही कारखानदारांनी शेतकऱ्याचा रात्रंदिवस काबाडकष्ट करून जोपासलेला ऊस गाळपासाठी घेऊन जाणार का नाही.? हा प्रश्न मात्र आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये सतावत आहे त्यामुळे कारखानदारांनी कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तात्काळ घेऊन जावा अन्यथा शेतकऱ्यांनाही वेगळा विचार करावा लागेल असे प्रसिद्धीपत्रकात शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा