सरकारी कामात व्यत्यय आणल्याचा आरोपातून तुळशीराम शिंदे यांची निर्दोष मुक्तता




  • सरकारी कामात व्यत्यय आणल्याचा आरोपातून तुळशीराम शिंदे यांची निर्दोष मुक्तता
बीड (प्रतिनिधी) :- फिर्यादी  यांनी नौकरी पोलीस कॉन्स्टेबल वाहतूक शाखा यांनी शिवाजी नगर  पोलीस स्टेशन येथे दि. 28/09/2006 रोजी फिर्यादी दिली की, त्यादिवशी त्यांची ड्युटी साठे चौक येथे सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत होती त्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास आरोपी मिलिंद वाघमारे व तुळशीराम शिंदे  हे सिल्वर कलर ची मॅक्स जीप रजि न MH23E3850  घेऊन येऊन साठे चौक येथे सागर हॉटेल समोर रस्त्याच्या मधोमध उभी केली त्यावेळी फिर्यादी याने आरोपींना सदर जीप रस्त्याच्या बाजूस घेण्यास सांगितले असता आरोपीने त्याच्या गाडीतील चार फुटाची लाकूड घेऊन येऊन फिर्यादी म्हणाला की तुमच्या मायला लय दादागिरी करता काय तुमच्याकडे बघतो फिर्यादीस धक्काबुक्की केली व दुसरा आरोपी सदर जीप घेऊन पसार झाला यामुळे ते बजावत असलेल्या सरकारी कर्तव्यात व्यत्यय आरोपींनी आणला अशा आशयाची कम्प्लेंट तक्रार शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतला त्याचा गुन्हा क्रमांक 412/2006 सदर घटनेचा तपास तपास अधिकारी प्रभाकर कवडे यांनी यांच्याकडे सोपवण्यात आला त्यांनी तपासाअंती सदर घटनेचे दोषारोपपत्र मान्य न्यायालयात दाखल केले सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण फिर्यादीसह इतर
पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले त्यानंतर सदर प्रकरण कोणताही सबळ पुरावा आढळून न आल्याने व बचाव पक्षाने घेतलेला बचाव व केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून  मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधिश साहेब बीड यांनी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी आरोपींना निर्दोष मुक्त केले सदर प्रकरणात .
आरोपितर्फे ऍड विवेक डोके व ऍड सागर नाईकवाडे यांनी काम पाहिले त्यांना सहकार्य ऍड राजेश जाधव, ऍड सतीश गाडे,  ऍड सुधीर जाधव, यांनी केले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा