टाऊन किंग संघाने पटकावला स्व. बाबुजी आव्हाड क्रिकेट करंडक




टाऊन किंग संघाने पटकावला स्व. बाबुजी आव्हाड क्रिकेट करंडक

पाथर्डी ।

येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या प्रांगणात गेली १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मा. आ. स्व. बाबुजी आव्हाड करंडक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद टाऊन किंग संघाने पटकावले. अंतिम फेरीच्या सामन्याची नाणेफेक मा. नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आली. टाऊन किंग आणि राजेंद्र कन्स्ट्रक्शन या दोन अव्वल संघात अंतिम फेरीचा सामना होऊन त्यामध्ये अभय आव्हाड यांनी पुरस्कृत केलेले रु ३१ हजाराचे पारितोषिक व विजेतेपद टाऊन किंग संघाने पटकावले. बंडूशेठ भांडकर यांनी पुरस्कृत केलेले रु २१ हजाराचे द्वितीय पारितोषिक व उपविजेतेपद राजेंद्र कन्स्ट्रक्शन संघाने पटकाविले. अजिनाथ डोमकावळे पुरस्कृत रु. ११ हजाराचे पारितोषिक गुलशन स्टार संघाने पटकाविले.
पारितोषिक व करंडक वितरण नगरसेवक प्रसाद आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी अमोलभैया गर्जे, आजिनाथ डोमकावळे, एड. प्रतिकदादा खेडकर, फारुखभाई शेख, राजेंद्र शिरसाट आदी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा