कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मान !




कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मान ; कुंदाताई काळे यांची कौतुकास्पद कामगिरी !!

बीड ।   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महिला मराठा क्रांती ग्रुप महाराष्ट्र राज्य बीड येथिल धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या कुंदाताई शामसुंदर काळे पाटिल याच्या विषेश परिश्रमातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या कर्तृत्ववान महिलांना जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .

या वर्षीच्या जिजाऊ रत्न पुरस्काराने डॅा .सुवर्णाराजे निंबाळकर सातारा , शिवमती सुंदरताई चौरे, बीड, शिवमती जयश्रीताई सावंत, शिवमती शोभाताई जाधव, प्रा .शांताताई पवार, शिवमती मंगलताई उबाळे, शिवमती आशाताई चव्हाण, शिवमती अरुणाताई औटे, शिवमती विद्या तीबोले, शिवमती कमलताई निंबाळकर ईत्यादी महिलांना सनमानित करण्यात आले आहे .

कार्यक्रमाच्या आध्यक्षा प्रा. छाया सोंडगे यांनी महिलांनी रोजगार निर्मिती करावी तसेच ऊद्योग व्यावसायात सहभागी होऊन देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास हातभार लावावा असे प्रतिपादन केले.प्रमुख पाहूण्या API मिना तुपे यांनी महिलांना संधीचे सोने करून घ्यावे तसेच समाजात निर्भिडपणे वावरावे असे आवाहन केले. सरस्वती जनार्धन तुपे यांनी महिलांना जिजाऊंच्या विचारांचा वारसा पुढे चालवावा व समाजास चांगले संस्कार द्यावेत अशी आपेक्षा व्यक्त केली.कुंदाताई काळे यांनी महिलांवी जिजाऊंच्या धाडसाी वृत्तीचा आंगीकार करावा, जुन्या चालीरीती रूढी परंपरा यातून बाहेर पडावे असे आवाहन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना रत्नमालाताई धांडे यांनी महिलांनी एकजूट व्हावे आणि समाज ऊपयोगी असे विधायक कार्य करावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजन आणि श्रि. संतोष डोंगरे यांनी गायलेल्या जिजाऊ वंदनेने आणि ऋषिकेश हावळेच्या भारदस्त पोवाड्या ने करण्यात आली. बाहारदार सूत्रसंचालन प्रा. रेखा ढेरे घोलप, व राजश्री काळे पिंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन सौ.वैशाली तळतकर यानी केले.

कार्यक्रमाला जिजाऊ रत्न पुरस्कार संयोजन समितीच्या प्रा. संध्या पाटील प्रा. संगीता इंगोले, अनिताताई शिंदे , आशा शिंदे, डॅा. क्रांती सावंत, प्रा. सरोज भोसले, अनिता भोसले, मीरा डावकर, चंद्रकला बांगर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष वर्षा माने, सुजाता माने, सौ अॅड. प्रेरणा डोईफोडे , आशाताई जगताप सौ मीनाताई चौरे सौ , सावित्री शिंदे , सुजाता सपकाळ, सुषमा गायकवाड, स्वप्नाली उबाळे, सौ शितल गायकवाड, सौ . ऊषा गोरे, सौ. सुजाता चव्हाण, सौ. दुर्गा जाधव , उपस्थित होत्या.
संभाजी ब्रिगेडचे शरद चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे संतोष जाधव, देवीसिंग शिंदे, व्याख्याते ज्ञानदेव काशिद, विनोद आप्पा इंगोले, बाळकृष्ण झोडगे, शहादेव हिंदोळे, दादासाहेब सादोळकर, वैभव स्वामी, परजणे सर ,तसेच बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा