बेलेश्वर संस्थानच्या महाराजांना, लिंबागणेश येथील डॉक्टरांना जीव वाचवण्यासाठी 45 लाखांची मागणी




बेलेश्वर संस्थानच्या महाराजांना, लिंबागणेश येथील डॉक्टरांना जीव वाचवण्यासाठी 45 लाखांची मागनी ।

नेकनूर।

लिंबागणेश जवळील बेलेश्वर संस्थांचे भारती महाराज यांना मोबाईलद्वारे चार लाखाची मागणी करण्यात आली यानंतर याच नंबर वरून लिंबागणेश येथील डॉ .सचिन जायभाये यांनाही तुमची सुपारी आली असून जीव वाचवायचा असेल तर 25 लाख रुपये द्या अशी मागणी करण्यात आली या दोघांनी नेकनूर पोलिसांत रविवारी दुपारी तक्रार दाखल केली आहे. रविवारी बेलेश्वर संस्थांनचे भारती महाराज यांना अनोळखी मोबाईल क्रमांक द्वारे तुमचा जीव वाचवायचा असेल तर चार लाख द्या अशी मागणी करण्यात आली यानंतर काही वेळाने याच मोबाईल क्रमांक द्वारे लिंबागणेश येथील डॉक्टर सचिन जायभाये यांना तुमची सुपारी पंचेचाळीस लाखाची असून जीव वाचवायचा असेल तर पैसे द्या अशी मागणी करण्यात आली या दोघांनी नेकनुर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून दोघांनाही एकाच नंबर वरून कॉल आले असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा