शिवनी सेवा सहकारी सोसायटी माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या ताब्यात




शिवनी सेवा सहकारी सोसायटी माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या ताब्यात

अरुण डाके यांच्या पॅनलचा दणदणीत विजय।

शिवनी ता. बीड येथील पाच गावची शिवणी सेवा सहकारी सोसायटी माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या ताब्यात आली असून, माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, डॉ. भारतभूषणजी क्षीरसागर, युवा नेते योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड बाजार समितीचे माजी सभापती अरुण नाना डाके यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या शिवणी भवानवाडी मोची पिंपळगाव काठोडा आणि वायभटवाडी या पाच गावच्या सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत सर्वच्या सर्व तेरा ही उमेदवार प्रचंड मतांच्या फरकाने निवडून आले असून, विरोधकांच्य पॅनलला धुरळा चारण्यात डाके नाना यशस्वी झाले आहेत.

जिल्ह्यात प्रतिष्ठेची झालेली ही शिवनी सहकारी सोसायटीची निवडणूक खऱ्या अर्थाने एकतर्फी झालेली असून, माजी मंत्री व विकास प्रिय नेतृत्व आदरणीय जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अरुण नाना डाकें सह सर्वच उमेदवार प्रचंड मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. शिवनी,भवानवाडी,काठोडा मोची पिंपळगाव, वायभट वाडी या पाचही गावच्या बहाद्दर मतदार बंधू-भगिनींनी जयदत्त अण्णांचे कुशल नेतृत्व या निमित्ताने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा स्वीकारल्याचे सिद्ध झाले आहे. विजयी उमेदवारांचे मा. जयदत्त अण्णा क्षीरसागर डॉ. भारतभूषण क्षीरसागर साहेब व योगेश भैय्या क्षीरसागर यांनी अभिनंदन केले असून, विजयी उमेदवारांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाचही गावच्या तरुण तडफदार युवक मंडळींनी व थोरा-मोठ्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सदरील उमेदवारांच्या विजयासाठी प्रचंड कष्ट घेतल्याचे या निमित्ताने दिसून आले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा