दिव्यांग वधू वर परिचय मेळाव्यास राज्यभरातून भरभरून प्रतिसाद




आ.डॉ.राहुल पाटील यांनी आयोजित केलेल्या दिव्यांग वधू वर परिचय मेळाव्यास राज्यभरातून भरभरून प्रतिसाद

परभणी l  लोकप्रिय आमदार डॉ.राहुल जी पाटील यांनी आयोजित केलेल्या सर्व धर्मीय दिव्यांग वधू -वर परिचय मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्रामधून भरभरून प्रतिसाद देण्यात आला, आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी नोंदणी जेवण चहा नास्ता साठी कुठलेही शुल्क न घेता मोफत व्यवस्था समिती कडून करण्यात आली होती . या परिचय सोहळ्यासाठी संपूर्ण राज्यभरातून 733 दिव्यांग वधूवरानी नोंदणी केली .तर 16 दिव्यंगाचे लग्न या मेळाव्यामध्ये जुळण्यात आली .

अखंड महाराष्ट्राचे हृदयस्थान असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती चे औचित्य साधून परभणीचे लाडके आमदार मा.डॉ.राहुल जी पाटील यांच्या संकल्पनेतून 26 फेब्रुवारी 2022 रोजी सर्व धर्मीय राज्यस्तरीय दिव्यांग वधू – वर परिचय मेळावा परभणी येथे अक्षता मंगल कार्यालय येथे घेण्यात आला .दिव्यांग व्यक्तीसाठी आणि त्यांच्या सर्व हक्कांसाठी शिवसेना नेहमी प्रयत्नशील असेल असे मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी आमदार डॉ.राहुल पाटील बोलत होते., या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संजय जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण,जिल्हाधिकारी आचल गोयल ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे ,शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर,मनपा आयुक्त देविदास पवार,विजय कान्हेकर ,उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख ,संजय घाडगे ,अंबिका डहाळे ,गजानन देशमुख ,रवींद्र पतंगे ,दिनेश बोबडे ,चंदू शिंदे ,सुशील कांबळे ,प्रसंश ठाकूर ,करामत खान ,ज्ञानेश्वर पवार ,बाळराजे तळेकर ,डहाळे आदी सर्व या वधू वर परिचय मेळाव्यास उपस्थित होते .

दिव्यांग बांधवांसाठी शिवसेना कायम त्यांच्या पाठीशी उभी असेल, समाजातील दुर्लक्षित विशेषतः अपंग बांधवाना मुख्य प्रवाहात आणून ,त्यांना रोजगार ची संधी उपलब्ध करून देणे ,तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या पर्यंत पोहचवणे गरजेचे असून येत्या काळात दिव्यांगांना रोजगार प्राप्तीसाठी एक अद्यावत संकेतस्थळ कार्यान्वित केले जाणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.

हा परिचय मेळावा यशस्वितेकडे नेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेले कार्यकर्ते ,अनिल डहाळे ,नवनीत पाचपोर ,उद्धव मोहिते ,नंदिनी पानपट्टे ,विष्णू वैरागड ,राहुल कांबळे ,नंदकुमार फुले ,नमिता पाटील ,भाग्यश्री काळभोर ,पुष्पा गोसावी ,चंद्रकांत अकोले ,सुभाष मोरे ,प्रकाश जाधव ,अशोक व्यवहारे ,बाबू फुलपगर,प्रकाश पेडगावकर ,संतोष पोटभरे ,गजानन कान्हेकर ,रितेश लाखे , गोपीनाथ घाणगाव ,मदन चव्हाण ,गजानन माळवदकर ,मनोहर ढाले ,कुंडलिक राठोड ,प्रकाश चव्हाण तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कान्हेकर यांनी केले .शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांनी सर्वांचे आभार मानले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा