काँग्रेसच्या  तालुका अध्यक्षपदी गणेश बजगुडे यांची वर्णी




काँग्रेसच्या  तालुका अध्यक्षपदी गणेश बजगुडे यांची वर्णी
बीड
मराठवाडा पत्र न्यूज।
  येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश बजगुडे पाटील यांची आज दिनांक २७ जानेवारी २०२२ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बीड तालुका अध्यक्षपदी निवड करून जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे, ज्येष्ठ नेते सुरेश तात्या पाटील, केज नगर पालिकेचे उपाध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून शुभेच्छा देण्यात आल्या.
       गणेश बजगुडे हे विद्यार्थी दशेपासुन सामाजिक चळवळीत सक्रिय असून छावा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष, शिवक्रांती युवा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, मराठा आरक्षण समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष इत्यादी पदावर त्यांनी अतिशय चांगले कार्य केलेले आहे. बीड जिल्हा रेल्वे कृती समिती, बायपास, मराठा आरक्षण, शिवस्मारक, इत्यादीसह शेतकरी, विद्यार्थी, कामगारांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलने केलेली आहेत. त्याचबरोबर आपल्या शिवक्रांती युवा परिषदेच्या माध्यमातून रुग्णसेवा किंवा गोरगरीब निराधारांना आधार देण्याचे काम सातत्याने ते करत असतात. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह अंबेजोगाई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत व रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल सोनवणे, यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. बीड तालुका व मतदार संघात त्यांचा प्रचंड जनसंपर्क व कार्यकर्त्यांची मोठी फळी असून त्यांच्या रूपाने बीड तालुका काँग्रेस पक्षाला उभारी मिळेल. याप्रसंगी गणेश बजगुडे म्हणाले की पक्षश्रेष्ठींनी माझावर जो विश्वास व जबाबदारी टाकलेली आहे ती मी खासदार रजनीताई पाटील, अशोक दादा पाटील, आदित्य पाटील, राजेसाहेब देशमुख, राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व जुन्या नव्या सहकाऱ्यांना विश्वासात घेवुन आदरणीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, नानाभाऊ पटोले, रजनीताई पाटील यांचे विचार, काँग्रेस पक्षाचे विचार व कार्य बीड तालुक्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी तन मन धनाने पुर्ण वेळ कुठलीही अपेक्षा नठेवता काम करेल. त्याच बरोबर तालुक्यात गाव तिथे शाखा व सभासद नोंदणी अभियानाच्या माध्यमातून गावोगाव काँग्रेसची पताका फडकवू. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे खासदार रजनीताई पाटील, अशोक दादा पाटील, आदित्य दादा पाटील, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राहुल भैया सोनवणे, पशुपतीनाथ दांगट, बाळासाहेब ठोंबरे, नवनाथ थोटे, नारायण होके, संभाजी जाधव,  महिला जिल्हाध्यक्ष मिनक्षिताई पांदुळे व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी शुभेच्या दिल्या.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा