महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध – मीनाक्षी देवकते




महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध – मीनाक्षी देवकते

बीड ।  जागतिक महिला दिन बीड येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सुशीलताई मोराले, प्रमुख पाहुणे म्हणून वैभव स्वामी (महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ विभागीय अध्यक्ष), भागवत वैद्य (दैनिक महाभारत जिल्हा प्रतिनिधी ),अलका डोंगरे (सामाजिक कार्यकर्ते), अंकुश निर्मळ (धनगर कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष), नितेश उपाध्याय (पत्रकार), संजय कुलकर्णी( पत्रकार), अरुणाताई आठवले (सामाजिक कार्यकर्ते ) इंगोले (आप्पा) धानोरा सरपंच ,यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिन हा कार्यक्रम संपन्न झाला.

शासकीय विश्रामगृह बीड येथे बानाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड अध्यक्ष मीनाक्षी डोमाळे -देवकते यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजकीय ,सामाजिक, उद्योग, आरोग्य ,संस्कृती, विधवा परितक्त्या ,प्रशासकीय या क्षेत्रातील महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्देशून सुशीलाताई मोराळे म्हणाले की, महिलांनी कणखर बनले पाहिजे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहिले पाहिजे. अनेक विविध समस्या वर त्यांनी माहिती दिली .
पूजा पवार आपल्या भाषणात म्हणाले की ,आजचा एक दिवस महिलांना मान- सन्मान केला जातो. प्रत्येक दिवस हा मानसन्मान केला पाहिजे. महिलांच्या समाज समस्येवर विविध प्रकारे प्रकाश टाकला. संस्थेच्या अध्यक्ष मीनाक्षी देवकते आपल्या भाषणात म्हणाले की, सर्व महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी नेहमी तत्पर व कटिबद्ध आहे. त्यामुळे निसंकोच ज्यांचे कोणाचे काही प्रश्न असतील त्यांनी मला संपर्क साधून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने करेल. सत्कारमूर्ती नंदाताई सारुक, पुनम कांबळे, मल्लिका दाभाडे, अडवोकेट दैवशलं शिंदे , यांनी धुंरदरे ,सुरेखा जाधव, स्वाती खुळे, नयना कुलकर्णी, सारिका गायकवाड, आरती परळीकर, अनुसया जाधव, प्रीती सानप, माधुरी घुमरे, लता मस्के, गव्हाणे ताई ,पूजा पवार आदींचा सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन मिनक्षी देवकते यांनी मानले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा