राहुल टेकाळे यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती




राहुल टेकाळे यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती

बीड।  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्ष व ईतर पदांकरता झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेत कुणाल राऊत यांनी आघाडी घेतली. त्यांनी ५ लाख ४८ हजार २६७ मते मिळाली. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राऊत यांच्यानंतर शिवराज मोरे (३ लाख ८० हजार ३६७) आणि शरण पाटील (२ लाख ४६ हजार ६९५) यांना मते मिळाली. अध्यक्ष पदासाठी शर्यतीमध्ये अव्वल असलेले कुणाल राऊत हे उर्जामंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव आहेत. कुणाल याआधीही प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राहीलेले आहेत. शरण पाटील हे माजी मंत्री बसवराज पाटील यांचे चिरंजीव आहे. शिवराज मोरे NSUI दोन वेळा प्रदेशअध्यक्ष होते. या निवडीमध्ये बीड जिल्ह्यातील सर्वसाधारण कुटुंबातील असणारे राहुल टेकाळे यांची प्रदेश सचिव म्हणुन मोठ्या मताधिक्याने निवडुन आले आहेत. राहुल टेकाळे हे कित्येक वर्षापासुन संघटनेमध्ये काम करत आहेत. दोन वेळी निवडणुक प्रक्रियेमधुनच बीड जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष राहीले आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा