हनुमान घोडके यांची युवक काँग्रेस बीड विधानसभा अध्यक्ष पदी निवड




हनुमान घोडके यांची युवक काँग्रेस बीड विधानसभा अध्यक्ष पदी निवड
राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेचे खरेखुरे उदाहरण म्हणजे घोडकेंचा विजय – गणेश बजगुडे पाटील

बीड ।   काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्यांच्या मुलांना पक्षाच्या प्रमुख पदावर घेवुन काम करण्याची संधी मिळावी यासाठी काँग्रेस पक्षांतर्गत युवक पदाधिकाऱ्यांच्या निवडी निवडणूक प्रक्रियेतुन होत असतात. यामधे युवक नेते आदित्य दादा पाटील यांच्या नेतृत्वात व काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब भाऊ देशमुख, उपाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे, नवनाथ थोटे व बीड तालुका अध्यक्ष गणेश दादा बजगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यातील घोडका राजुरी येथील अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील हनुमान अहीलाजी घोडके यांनी तब्बल २५१४ मते घेवुन प्रथम क्रमांकाने विजयी झाले. घोडके हे गणेश बजगुडे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते शिवक्रंती युवा परिषदेचे माजी बीड तालुका अध्यक्ष असुन त्यांनी गणेश बजगुडे यांच्या नेतृत्वात काँग्रेस प्रवेश केला होता. अतिशय सामान्य कार्यकर्त्याला अतिशय कमी वेळेत एका राष्ट्रीय पक्षाचे युवक अध्यक्ष ही खुप मोठी जबाबदारी असुन राहुल जी गांधी यांच्या संकल्पनेचे ते खरेखुरे उदाहरण ठरू शकतात. बीड मतदार संघातील २५१४ तरुणांनी त्यांना पसंती देवुन काम करण्याची मोठी संधी दिलेली आहे. यावेळी घोडके म्हणले की, या निवडणुकीत मला गणेश दादा बजगुडे यांनी उभा करून निवडून ही आणले आहे. तालुक्यात त्यांचा आसलेला संपर्क व काम हे माझ्या कामी आले. यापुढील काळात लोकनेत्या खासदार रजनीताई पाटील साहेब, माजी मंत्री अशोक दादा पाटील साहेब, युवा नेते आदित्य दादा पाटील साहेब, काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब भाऊ देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे, आमचे नेते बीड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांच्यासह युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस धीरज भैया पाटील, बीड जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास बेद्रे यांच्या नेतृत्वात मतदार संघात युवकांचे संघटन बांधणी व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील. त्यांच्या निवडीबद्दल राज्यसभा खासदार रजनीताई पाटील, अशोक दादा पाटील साहेब, युवा नेते आदित्य दादा पाटील, बीड जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब भाऊ देशमुख, उपाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे, नवनाथ बापू थोटे, गणेश दादा बजगुडे, संतोष निकाळजे यांच्यासह अनेकांनी शुभेच्या दिल्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा