आ. सुरेश धस यांच्यासह आष्टी तालुक्यातील थोरवे कुटुंबियांचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी केले सांत्वन




 

युक्रेन मधून सुखरूप परतलेल्या अनिकेत लटपटेची पालकमंत्र्यांनी घेतली भेट

आष्टी l

विधानपरिषद सदस्य आ. सुरेश धस यांच्या मातोश्री सुमन अक्का धस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले होते, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी रविवारी सायंकाळी आ. धस यांच्या आष्टी येथील निवासस्थानी भेट देऊन धस कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी धस कुटुंबियांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

तदनंतर आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथील मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक तथा कडा कारखान्याचे संस्थापक ज्येष्ठ नेते स्व. साहेबराव थोरवे दादा यांच्या निवासस्थानी भेट देऊन थोरवे कुटुंबियांचे सांत्वन केले.

वयाचे 120 वर्ष थोरवे दादा लोकाभिमुख नेतृत्व म्हणून काम करत राहिले, अगदी शेवटच्या काळापर्यंत मुंबईपर्यंत प्रवास करून सामान्य लोकांची कामे घेऊन दादा नेहमी मुंबईत येत असत, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील असे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

आष्टी तालुक्यातील अनिकेत भाऊसाहेब लटपटे हा विद्यार्थी युद्ध परिस्थितीत युक्रेन मधील खारकीव येथे अडकलेला होता. बीड जिल्हा प्रशासन, ते युक्रेन मधील भारतीय दूतावास यांच्या सहयोगाने अनिकेत व जिल्ह्यातील अन्य तीन विद्यार्थी सुखरूप मायदेशी स्वगृही परतले. रविवारी आष्टी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ना. धनंजय मुंडे यांनी अनिकेतची भेट घेऊन चर्चा केली. युद्धजन्य परिस्थितीतले त्याचे अनुभव, प्रवासातील घटना आदी बाबी जाणून घेत ना. मुंडेंनी अनिकेतला शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

यावेळी ना. मुंडे यांच्या समवेत माजी आ. साहेबराव दरेकर नाना, सतिष शिंदे, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, किशोर हंबर्डे, अप्पासाहेब राख, विठ्ठल अप्पा सानप, नारायण बप्पा शिंदे, महादेव डोके, शिवाजीराव नाकाडे, विश्वास नागरगोजे, गोकुळ सवासे, शिवदास शेकडे, बाळासाहेब गर्जे यांसह आदी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा