जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जहागिरमोहा येथे सातवीच्या निरोप




किल्लेधारुर l
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जहागीर मोहा येथील इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने दि.२७ बुधवार रोजी निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर शिंदे हे होते. प्रथमत: शिक्षणा ची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तद्नंतर प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन पर भाषण केले. तसेच सातवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक श्री. पिसाळ यांनी विद्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यात यश मिळण्यासाठी मौलिक असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी सातवीचा वर्गातर्फे शाळेला एक भिंतीवरचे घड्याळ भेट म्हणून देण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर डोंगरे यांनी तर आभार प्रदर्शन संजय कांदे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी सहकार्य केले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा