धारूर महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उदघाटन संपन्न




किल्लेधारूर ।

येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी शैक्षणिक वर्ष 2021 -22 या वर्षातील विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक महादेव जोगडे यांची उपस्थिती होती तर उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर अशोक कराड रसायनशास्त्र विभाग महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर यांची विशेष उपस्थिती होती तसेच धारूर शहरातील दैनिक लोकमतचे प्रतिनिधी माननीय अनिलजी महाजन व दैनिक कार्यारंभ चे प्रतिनिधी माननीय सचिन थोरात यांची प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थिती होती तसेच श्री विश्वास शिनगारे व पत्रकार साखरे यांचीही विशेष उपस्थिती होती महाविद्यालयाचे उपप्राचार्य मेजर डॉक्टर मिलिंद गायकवाड यांची याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गोपाळ काकडे यांनी केले तसेच याप्रसंगी विज्ञान मंडळाचे विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी कनक आकळे व साक्षी पंडित या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले तसेच याप्रसंगी महान शास्त्रज्ञ सी वी रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्राध्यापक डॉक्टर अशोक कराड यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील पदवी नंतर ज्या विविध संधी उपलब्ध आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच त्याने विद्यार्थ्यांना डॉक्टर व इंजिनीयर होण्यापेक्षा त्याच तोडीच्या अनेक संधी करिअरच्या उपलब्ध असल्याचे आपल्या व्याख्यानातून माहिती दिली याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भीतीपत्रकाचे विमोचन प्रमुख उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य प्राध्यापक महादेव जोगडे यांनी केला पुढे बोलताना ते असे म्हणाले की अशी मंडळे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी निर्माण करण्यात येतात विद्यार्थ्यांनी याचा आपल्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन साक्षी रहेकवाल हिने तर आभार प्रदर्शन प्रणिता
शेरकर या विद्यार्थिनीने केले याप्रसंगी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथपाल गोपाळ सगर यांनी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी ग्रंथपाल गोपाळ सगर यांनी विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विज्ञान शाखेतील प्राध्यापक डॉक्टर अशोक लाखे प्राध्यापक प्रा डॉ एल बी जाधवर डॉ डी एन गंजेवार डॉक्टर राम भोसले प्राध्यापक डॉ अनंथा गाडे डॉक्टर सविता सूक्ते प्राध्यापक टेकाळे मॅडम प्राध्यापक अशोक भोसले प्राध्यापक विजय तपसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा