नियमित व्यायाम आणि आरोग्य !..




  • नियमित व्यायाम आणि आरोग्य ……
    .चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला नकळत सर्व वयोगटातील लोकं अनेक आजारांना बळी पडतात. उत्तम आरोग्यासाठी आपला आहार जितका महत्त्वाचा आहे, तितकाच व्यायामही महत्त्वाचा आहे. आपली जीवनशैली निष्क्रिय होत चालेली आहे, एकतर आपण खूप बसतो किंवा आपण बराच वेळ झोपतो. त्यात आपल्याला मोकळा वेळ मिळाला तर मोबाईल किंवा टीव्ही, लॅपटॉप आणि हातात गेम खेळण्यात मग्न होऊन जातो. त्यात गेल्या दोन वर्षात प्रत्येकजण करोनाच्या भीतीने घरातच राहून आपली दैनंदिन कामे करत आहेत. या अशा परिस्थितीत चालणे नाही, व्यायाम नाही, याने तुम्ही नकळत कोणत्या न कोणत्या गंभीर आजारांना बळी पडू शकतात.

तुम्हाला माहितच आहे की नियमित व्यायाम केला नाही तर काही न खातापिता तुम्ही जाडे होऊ शकतात. असे जीवन तुम्हाला मधुमेह, थायरॉईड आणि रक्तदाबाचे रुग्ण बनवू शकतात. व्यायामाशिवाय तुम्ही टाईप-२ मधुमेह या आजाराला देखील बळी पडू शकता. निरोगी जीवनासाठी व्यायाम करणे किंवा चालणे खूप महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात तुम्ही व्यायाम केले नाही तर तुम्ही कोणत्या आजारांना बळी पडू शकता.

 

 

मधुमेह हा आजार होऊ शकतो
चुकीच्या जीवनशैलीमुळे तुम्हाला मधुमेह हा आजार होण्याची शक्यता आहे. मधुमेह हा अयोग्य जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. ज्यामध्ये योग्य आहार नसल्यास आणि व्यायाम न केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. मधुमेहाच्या रुग्णांना साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी चालणे आणि व्यायाम करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ नेहमी देतात.

 

लठ्ठपणा वाढू शकतो
तुम्ही जर सतत घरात बसून काम करत असाल आणि त्यात व्यायाम देखील करत नसाल तर तुमच्या कॅलरीज कमी बर्न होतील आणि तुम्ही लठ्ठपणाचे शिकार व्हाल. जर तुमच्याकडे व्यायाम करण्यासाठी वेळ नसेल तर जेवल्यानंतर चाला. तसेच शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर लठ्ठपणा दूर ठेवा.

सांधेदुखी होऊ शकते
निष्क्रिय जीवनशैलीमुळे तुम्हाला हाडे आणि सांधेदुखीची समस्या उद्भवू शकते. जी लोकं व्यायाम करत नाहीत त्यांचे शरीर, पाठ, कंबर किंवा हात पाय दुखण्याची तक्रार करतात. त्यामुळे नेहमी नियमित थोडावेळ तरी व्यायाम करा.

नैराश्याचे शिकार होऊ शकता
व्यायाम न केल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. निष्क्रिय जीवन पद्धतीमुळे तुम्ही नैराश्याचे बळी ठरू शकता. तुम्हालाही ताण-तणाव आणि चिंता यापासून दूर राहायचे असेल तर दिवसातून अर्धा तास व्यायाम करा.

हृदयविकाराचा धोका वाढू शकतो
निष्क्रिय जीवनशैलीमुळे तुम्हाला हृदयाचे आजार होऊ शकतात. हृदयाचे आरोग्य लक्षात ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. जर तुम्ही जिममध्ये व्यायाम करत नसाल तर सायकल चालवणे, पायऱ्या चढणे आणि चालणे यासारखे कार्डिओ व्यायाम करा. व्यायामामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. शारीरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम.

नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्यायामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते.

नियमित व्यायामामध्ये; ताणण्याचे व्यायाम, एरोबिक्स व श्वासाचे व्यायाम यांचा समावेश असावा.व्यायाम केल्याने माणसाला नवीन उर्जा प्राप्त होते.व्यायाम हा कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतो. बैठे व्यायामही करता येतात.

==व्यायामाचे प्रकार== (type of yoga) १. ताणण्याचे व्यायाम
उदा. योगासने, सूर्यनमस्कार

२. एरोबिक्स (रक्ताभिसरणाचे) व्यायाम
उदा. चालणे, धावणे, जॉगिंग, नृत्य, पोहोणे, सायकल चालविणे

३. श्वासाचे व्यायाम . प्राणायाम

४. शक्तिचे व्यायाम
उदा. वजन उचलणे व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.यामुळे माणूस आनंदी रहातो. व्यायामामुळे आपली मानसिक तसेच शारीरिक शक्ती वाढते. लहान मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा ही सध्याची गंभीर जागतिक समस्या आहे आणि व्यायामामुळे ही समस्या कमी होण्यास मदत होते.

==व्यायामाचे फायदे

वजन नियंत्रित राहण्यास मदत
शारीरिक क्षमते मध्ये वाढ
नैराश्याचे प्रमाण कमी होणे
उत्साह वाढणे
शरीर पिळदार होणे
रोग प्रतिकार क्षमता वाढते
स्नायू मजबूत होतात.लव फिटनेस अँड प्रेवेंट डीसेसेस अर्थात नियमित व्याया म करा आणि आजार टाळा. डॉ.प्रमोद शिंदे,राज्य उपाध्यक्ष,महाराष्ट्र अस्थिरोग तज्ञ संघटना

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा