पैसे घेऊन भरती केली जाते सिरसट यांचा आरोप




धारूर सुभाष साखरे ।

जगप्रसिद्ध अंजिठा लेणीत कामावर घेतांना मागासवर्गीयांवर अन्याय केला जात असून पैसे घेऊन इतर समाजातील लोकांना कामावर घेतले जात असल्याचा आरोप डाॅ. आंबेडकर सेंटर फॉर जस्टीस संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या ठिकाणी दहा वर्षापासून कार्यरत असलेल्या सिक्युरिटी गार्ड यांनी एक व्हिडिओ तयार करून आपल्यावर गोरगरीब दलित बौद्ध मागासवर्गीयांवर होणारा अन्याय अत्याचार याविषयी मत मांडून व्हिडिओ व्हायरल केला आहे.

दुसरा विषय पंधरा वर्षापासून काम करणारे सुभाष दामोदर प्रेम जाधव चंदू दामोदर यांना कामावर न घेता इतर वशिलेबाजी करून इतर समाजाच्या लोकांकडून पैसे घेतले जातात व त्यांना कामावर ठेवले जाते. आणि गावातील मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या लोकांना अजंठा लेणीमध्ये काम देत नाही व हे अधिकारी त्यांना भेटण्यास टाळाटाळ करत असतात. याची दखल घेत आंबेडकर सेंटर फॉर जस्टीस अँड पीस (आंतराष्ट्रीय मानवाधिकार संघटना) यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच मराठवाडा अध्यक्ष रवींद्र सिरसट यांनी लाच घेणारा व देणारा यांच्यावर फौजदारी गुन्हा तसेच अजंठा येथील सिक्युरिटी गार्डला आरक्षण राहण्याकरिता आवाज उठवला आहे. अजंठा लेणीत होणाऱ्या अन्याय-अत्याचार विषयी निवेदन पत्र, अर्ज, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक औरंगाबाद यांना सादर केले आहे. तसेच, पुढील योग्य कार्यवाहीसाठी जिल्हा अधिकारी औरंगाबाद, विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद व राष्ट्रीय अध्यक्ष नागसेन सोनारे यांना देण्यात आले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा