छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सैनिकी शाळा येथील कोविड सेंटर मध्ये मास्क व फळ वाटप




छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सैनिकी
शाळा येथील कोविड सेंटर मध्ये मास्क व फळ वाटप
बुलंद छावाचे अध्यक्ष विठ्ठल बहीर यांचा उपक्रम

बीड दि . 14 ( प्रतिनिधी ) छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सैनिकी शाळा नगर रोड बीड येथील कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना बुलंद छावाच्या वतीने बहुजन वंचित आघाडीचे विभागीय अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे , शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन भैय्या धांडे . सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य शाम डाके यांच्या प्रमुख उपस्थितीत मास्क व फळवाटप करण्यात आले.
प्रतिवर्षी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते बुलंद छावा मराठा युवा परिषद च्या वतीने शंभूराजांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागात व्याख्यानाचे आयोजन करून शंभू सप्ताह आयोजित केला जातो परंतु यावर्षी कोरोना रोगाची साथ असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव पोहोचला आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी व ग्रामीण भागात वाढत जाणारी रुग्ण संख्या आणि नंतर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक कोविड सेंटर उभारण्यात येत आहे जनसेवा म्हणून सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांना माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांनी सैनिकी शाळेमध्ये कोविड सेंटर चालू केले आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुलंद छावाच्या वतीने रुग्णांना मास्क व फळवाटप करण्यात आले बुलंद छावाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल बहीर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बुलंद छावाचे जिल्हा सचिव आजिनाथ आदमाने ,बीड तालुका अध्यक्ष नारायण गवते , जगदीश परदेशी ,अंकुश बुंदेले, डॉ . आशा जाधव पार्वती शेरे ,विशाखा अरगडे , सुदेशना जाधवर, अनिता मुंडे ,कावेरी जाधव ,नितीन जाधव . दीपक बहीरवाळ ,सचिन रहाडे , शाळेचे शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा