शेतकऱ्यांना पेरणीपूर्व खत- बियाणे मिळावे यासाठी मोंढ्यातील व्यापाऱ्यांशी बैठक




माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची तत्परता

शेतकऱ्यांना पेरणीपूर्व खत- बियाणे मिळावे यासाठी मोंढ्यातील व्यापाऱ्यांशी बैठक

बीड
आजच हवामान खात्याने मान्सून आगमनाची बातमी दिली आणि काही दिवसातच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी खत बियाण्यांचे वाटप वेळेत व्हावे यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी तत्परतेने मोंढा भागातील कृषी विक्रेत्या व्यापाऱ्याची आढावा बैठक घेतली .

काही दिवसातच मान्सूनचे आगमन होऊन पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत खत बी बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज मोंढा भागात खते बी-बियाणे विक्रेत्यांची बैठक घेऊन आढावा घेतला यावेळी मनमोहन कलंत्री सत्यनारायण कासट, भीमराव काळे, शितल बागमार, जगदीश मंत्री, अंगत नवले, रुपेश ओस्तवाल, सतीश खाडे, शिरीष सरवदे, गणेश भोज, विष्णू तांदळे, बाळू पोपळे, महेश मानूरकर, आदि व्यापारी उपस्थित होते यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या अनेक समस्या मांडल्या शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी खते बी बियाणे उपलब्ध व्हावेत तसेच पुरवठा वेळेत व्हावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून आढावा घेण्यात आला साध्या महाबीज बियाणे उपलब्ध नाहीत खतावरील जीएसटी कमी करावी तसेच व्यापाऱ्यांना मिळणारी सबसिडी योग्य प्रमाणात ठेवावी, बीड जिल्ह्यासाठी खताचा कोठा वाढून मिळावा, डीएपी युरिया व सुपर फॉस्फेटचा पुरवठा सध्या अल्प प्रमाणात होत आहे तो पुरेसा पुरवठा करण्यात यावा सर्व रासायनिक खते फर्टीलायझर कंट्रोल प्रमाणे नुसार देण्यात यावे, व्यापाऱ्यांना स्वतःच्या पैशाने मालवाहतुकीचा खर्च करावा लागतो त्यामुळे एमआरपी पेक्षा अधिक किंमत ग्राहकांना द्यावी लागते, डीलर मार्जिन गेल्या पंचवीस वर्षापासून कमी आहे खताचे भाव वाढले असले तरी कमिशन मात्र कमीच आहे उत्पादक कंपन्यांच्या लिंकिंग माल व इतर बियाण्यांची वाणे बळजबरीने दिले जातात, शासनाकडून 20 मेपासून बीटी कपाशीचे बियाणे विक्रीची परवानगी मिळावी जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत बी बियाणे खते देता येईल असे व्यापाऱ्यांनी बोलताना सांगितले या सर्व समस्या जाणून घेत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि राज्याचे कृषी मंत्रालयाचे सचिव ढवळे यांच्याशी तातडीने संपर्क साधून याबाबत विचार व्हावा अशी मागणी केली,व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे व्यापाऱ्यांना घेऊन लवकरच दिल्लीला जाऊन खत मंत्री मनसुखभाई मांडविया यांना भेटणार आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा